LIVE : #मनसे_महाअधिवेशन, अमित ठाकरेंचं लाँचिंग

मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे शिक्षण आणि क्रीडा विषयक ठराव मांडणार आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:30 AM, 23 Jan 2020

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन (Raj Thackeray MNS Maha Adhiveshan) मुंबईत होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. तर सुपुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी वर्णी लावत त्यांचं धडाकेबाज लाँचिंग केलं. राज ठाकरे अधिवेशनात कोणती भूमिका मांडणार, पक्षाचा अजेंडा काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. गोरेगावातील नेस्को ग्राऊण्डवर सकाळी नऊ वाजल्यापासून महाअधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

[svt-event title=”अमित ठाकरे म्हणतात पायाखालची जमीन सरकली” date=”23/01/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अमित ठाकरे यांची मनसे नेतेपदी वर्णी” date=”23/01/2020,12:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनसेची मुलूख मैदानी तोफ रुपाली पाटील यांचं भाषण” date=”23/01/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शालिनी ठाकरेंनी ‘सक्षम महिला आणि महिला अधिकार’ हा दुसरा ठराव मांडला” date=”23/01/2020,11:42AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जयप्रकाश बाविस्करांनी ‘मराठी महाराष्ट्र’ हा पहिला ठराव मांडला” date=”23/01/2020,11:41AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अविनाश अभ्यंकरांनी मांडला मनसेचा प्रवास” date=”23/01/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे यांचं सुरुवातीचं भाषण” date=”23/01/2020,11:46AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण” date=”23/01/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मनसेच्या मंचावर सावरकरांचाही फोटो” date=”23/01/2020,9:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे सहकुटुंब अधिवेशन स्थळी दाखल” date=”23/01/2020,9:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे महाअधिवेशनाला रवाना” date=”23/01/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मनसेच्या महाअधिवेशनसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मनसेच्या नेत्यांनी नाराज शिवसैनिकांनाही मनसेत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे महाअधिवेशनात मनसेमध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांची मेगाभरती होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असण्याची चिन्हं व्यक्त केली जात आहे. झेंड्यावर सोनेरी रंगात षटकोनी राजमुद्रेप्रमाणे महाराष्ट्र धर्म लिहिलं असल्याची शक्यता आहे.

मनसेचं महाअधिवेशन नेमकं कसं असेल?

महाअधिवेशनात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे शिक्षण आणि क्रीडा विषयक ठराव मांडणार आहेत. मनसे विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी अमित ठाकरे यांना व्यासपीठावर तलवार देऊन स्वागत करणार. महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं शानदार लाँचिंग करण्याची तयारी आहे.

मनसेच्या महाअधिवेशनात काय?

पहिलं सत्र 9 ते 1 

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचा उद्घाटन सोहळा. मनसेचा नवीन झेंडा आणि मनसेची नवीन दिशा (टॅगलाईन) अनावरण
  • प्रमुख वक्ते आणि नेत्यांची भाषणं

विविध विषयांवर पक्षाची काय भूमिका असली पाहिजे, त्याबाबत ठराव मांडले जातील. प्रत्येक ठराव मांडण्याची जबाबदारी एका एका नेत्यावर दिली आहे. याला सूचक- अनुमोदन दिलं जाईल. (उदा- शिक्षण या विषयावर पक्षाची भूमिका काय हे जाहीर केलं जाईल)

दुसरं सत्र – 2.30 ते 5 

  • प्रमुख वक्ते आणि नेत्यांची भाषण

तिसरे सत्र – 5 वाजल्यानंतर

  • संध्याकाळी साडेसहा वाजता राज ठाकरे यांचं भाषण, पक्षाची नवी दिशा, भूमिका, पक्षबांधणी, पक्षाचा नवीन झेंडा याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील.
  • राज ठाकरे यांच्या भाषणानंतर महाअधिवेशनाचा (Raj Thackeray MNS Maha Adhiveshan) समारोप होईल.

पाहा व्हिडीओ :