अभिनेते सचिन पिळगावकरांच्या वडिलांची सन्मानचिन्हं नोकरानं भंगारात विकली

मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Theft in Sachin Pilgaonkar Home) यांच्या वडिलांची सन्मानचिन्हे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अभिनेते सचिन पिळगावकरांच्या वडिलांची सन्मानचिन्हं नोकरानं भंगारात विकली

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Theft in Sachin Pilgaonkar Home) यांच्या वडिलांची सन्मानचिन्हे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे ही चोरी दुसरी तिसरी कोणी केलेली नसून त्यांच्या घरातील नोकरानेच केल्याचं समोर आला आहे. नोकरानेच घरातील महागडी सन्मानचिन्हं भंगारात विकल्याची तक्रार सचिन पिळगावकर यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नोकरावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर (Producer Sharad Pilgaonkar) हे मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चित्रपट निर्माते होते. त्यांना अनेक उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी गौरवण्यात आलं होतं. त्याचीच ही सन्मानचिन्हे होती. सचिन पिळगावकरांनी वडिलांची आठवण म्हणून ही सर्व सन्मानचिन्हे घरात ठेवली होती. मात्र, घरातील नोकराने एक एक करुन ही सन्मानचिन्हे चोरली. आरोपी नोकराने अवघ्या 300 ते 400 रुपयांना ही सन्मानचिन्हे विकल्याचीही माहिती समोर आली आहे.

सांताक्रुझ पोलीस (Santacruze Police) ठाण्यात या प्रकरणी आरोपी नोकर अमृत सोळंकी (Amrut Solunki) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अमृत सोळंकीला अटकही केली आहे. निर्माते शरद पिळगावकर यांनी सव्वाशेर, अष्टविनायक, चोरावर मोर, नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटांची निर्मिती केली होती. या चित्रपटावरून त्यांना अनेक नावाजलेले पुरस्कार आणि सन्मानचिन्हे मिळाली होती.

वडिलांच्या आठवणी असलेल्या या सन्मानचिन्हांची अशाप्रकारे कवडीमोल पैशांसाठी विक्री केल्याने सचिन पिळगावकरांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *