बीकेसी कोव्हिड सेंटरने करुन दाखवलं, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, 10 हजार रुग्णांवर यशस्वी उपचार

बीकेसी येथील जम्बो कोव्हिड सेंटर फेज वनमध्ये आतापर्यंत 10 हजार 17 रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहे. कोव्हिड सेंटरमध्ये दाखल झालेला रुग्णांपैकी एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. Ten thousand corona patient got treatment and not single fatality recorded  in BKC jumbo covid center phase one

बीकेसी कोव्हिड सेंटरने करुन दाखवलं, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, 10 हजार रुग्णांवर यशस्वी उपचार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बीकेसी येथील जम्बो कोव्हिड सेंटर फेज वनमध्ये आतापर्यंत 10 हजार 17 रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहे. त्यापैकी 9 हजार 145 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोव्हिड सेंटरमध्ये दाखल झालेला रुग्णांपैकी एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. या चांगल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोव्हिड सेंटरमधील डॉक्टर, परिचारिका व संबंधित रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना भेटून त्यांचे कौतुक केले. (Ten thousand corona patient got treatment and not single fatality recorded  in BKC jumbo covid center phase one)

मे महिन्यापासून बीकेसी कोव्हिड फेज वनमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण दाखल झाले. यामध्ये रक्तदाब आणि मधुमेह आजार असणारे रुग्ण होते. मात्र, हे सर्व रुग्ण बरे होऊन गेले आहेत. यापैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबईच्या कोरोना लढ्याचं जागतिक यंत्रणांनी देखील कौतुक केले असल्याचे पेडणेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

कोव्हिड सेंटरच्या स्टाफचं कौतुक

बीकेसी येथील जम्बो कोव्हिड सेंटरच्या फेज वन सेंटरमध्ये आतापर्यंत दाखल झालेल्या रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबई महानगरपालिकेसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. या कोव्हिड सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांच्या नेतृत्वात संबंधित डॉक्टर व सर्व यंत्रणा चांगली काम करत आहे. याबद्दल डॉ. राजेश डेरे व त्यांचे संपूर्ण डॉक्टर, परिचारिका व रुग्णालयीन कर्मचार्‍यांचे कौतुक महापौरांनी केले.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटरमधून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांशी संवाद साधला. बीकेसीमधील जम्बो कोव्हिड सेंटर येथे बायोसेफ्टी तीन श्रेणीतील “व्हायरस चाचणी अद्यावत प्रयोगशाळा” (वायरस इम्मुनोलॉजी टेस्टिंग लॅब) कंटेनरमध्ये नव्याने स्थापन करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.

यापूर्वी कोरोना रुग्णांचे नमुने खासगी प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येत होते. आता या प्रयोगशाळेमध्ये कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधोपचारांच्या सर्वच तपासण्या या प्रयोगशाळेमध्ये होणार आहेत, अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली.

बीकेसी कोव्हिड सेंटर फेज वनमध्ये या 2 हजार 26 बेड असून यामध्ये 108 बेड हे आयसीयू आहे तर 12 बेड हे डायलिसिसचे आहे. या ठिकाणी 213 डॉक्टर कार्यरत असून 208 परिचारिका व 232 वॉर्डबॉय चांगल्या रीतीने काम करत असल्याचं डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या: 

CORONA | बीकेसीत 1000, महालक्ष्मीजवळ 600 बेड्स, मुंबईत कोरोना उपचारांसाठी कुठे किती सुविधा?

चक्रीवादळाचा फटका ही अफवा, बीकेसीतील कोव्हिड 19 रुग्णालय दणक्यात उभं : महापालिका

(Ten thousand corona patient got treatment and not single fatality recorded  in BKC jumbo covid center phase one)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *