IAS Sanjay Kumar | कोण आहेत महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव संजय कुमार?

सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहात आहेत. गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

IAS Sanjay Kumar | कोण आहेत महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव संजय कुमार?
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 10:38 PM

मुंबई : आयएएस संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती (New Chief Secretary IAS Sanjay Kumar) करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता (Ajoy Mehta) हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर संजय कुमार हे मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहात आहेत. गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे (New Chief Secretary IAS Sanjay Kumar). संजयकुमार फेब्रुवारीमध्ये निवृत्त होत आहेत.

मे 2019 मध्ये अजोय मेहता यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन थेट राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली होती. अजोय मेहता यांना यापूर्वी मुदतवाढ मिळाली होती. मात्र, आता पुन्हा मुदतवाढ मिळालेली नाही. अजोय मेहता यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या रेसमध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची नावं होती. मात्र संजय कुमार यांच्या नावाला पसंती मिळाली.

कोण आहेत संजय कुमार?

  • संजय कुमार  हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • संजय कुमार हे अजोय मेहतांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • ते मूळचे बिहारचे असून त्यांना प्रशासकीय सेवेचा दीर्घ अनुभव आहे
  • संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत.
  • संजय कुमार गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळतात.

New Chief Secretary IAS Sanjay Kumar

अजोय मेहतांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नेमणूक

दरम्यान, अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळाली नसली, तरी त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खास पद दिलं आहे. अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.

सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलं.

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरु करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

New Chief Secretary IAS Sanjay Kumar

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.