VIDEO: कोरोनाचा दुसरा डोस घेऊनही एक हजार डॉक्टर दगावले, हे कसले डॉक्टर?; रामदेव बाबांनी पुन्हा डिवचले

आधी कोरोनावरील अॅलिओपॅथीच्या उपराचावर टीका केल्यानंतर योग गुरु रामदेव बाबांनी आता थेट डॉक्टरांची खिल्ली उडवली आहे. (10k doctors died despite vaccine, says Baba Ramdev)

VIDEO: कोरोनाचा दुसरा डोस घेऊनही एक हजार डॉक्टर दगावले, हे कसले डॉक्टर?; रामदेव बाबांनी पुन्हा डिवचले
Baba Ramdev

नवी दिल्ली: आधी कोरोनावरील अॅलिओपॅथीच्या उपराचावर टीका केल्यानंतर योग गुरु रामदेव बाबांनी आता थेट डॉक्टरांची खिल्ली उडवली आहे. कोरोनाचा दुसरा डोस घेऊनही एक हजार डॉक्टर दगावले. हे कसले डॉक्टर?, असा सवाल रामदेव बाबांनी केला आहे. रामदेव बाबांचा या धक्कादायक वक्तव्याचा एक व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (10k doctors died despite vaccine, says Baba Ramdev)

रामदेव बाबांचा योग अभ्यासाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रामदेव बाबा योग करत असून जमलेल्या लोकांशी चर्चा करत आहेत. कोरोनाचा डबल डोस घेऊन एक हजार डॉक्टर दगावले. स्वत:लाही वाचवू शकत नाही, ती कसली डॉक्टरी?, असा सवाल रामदेव बाबांनी केला आहे.

टर… टर…टर…टर…

याच व्हिडीओत त्यांनी डॉक्टरांची खिल्ली उडवली आहे. तिसरा व्यक्ती म्हणाला, मला डॉक्टर व्हायचं आहे. टर… टर…टर…टर…टर…टर… टर बनयाचे आहे…डॉक्टर… एक हजार डॉक्टर तर आताच कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतर दगावले…. किती?…एक हजार… कालचीच बातमी आहे…स्वत:ला वाचवू शकत नाही, ती कसली डॉक्टरी?, अशा शब्दात रामदेव बाबा डॉक्टरांची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

माझ्यासारखे डॉक्टर व्हा

डॉक्टर व्हायचेच असेल तर स्वामी रामदेव सारखं व्हा. माझ्याकडे कोणतीही डिग्री नाही. तरीही मी सर्वच विषयांचा डॉक्टर आहे. विदाऊट एनी डिग्री… विथ डिव्हिनिटी… विथ डिग्निटी आय अॅम ए डॉक्टर, असंही ते या व्हिडीओत पुढे म्हणतात.

अॅलिओपॅथीवर काय म्हणाले?

यापूर्वी रामदेवबाबाने व्हॉटसअॅपवर एक मेसेज करून अॅलोपॅथीवर टीका केली होती. आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरलं, नंतर अँटिबायोटिक्स फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झाले, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली, असं ते म्हणाले होते. तापावर दिलं जाणारं फॅबीफ्ल्यू देखील निकामी ठरलंय. जेवढे औषधं देत आहेत त्या सर्वांचं हेच होत आहे. त्यामुळे हा काय तमाशा सुरू आहे, असं जनता म्हणत आहे. त्यांची तापावरील कोणतीही औषधं काम करत नाहीये. कारण ते शरीराचं तापमान कमी करत आहेत. मात्र, ज्या विषाणूमुळे, बुरशीमुळे ताप येत आहे त्याचा यांच्याकडे इलाज नाही. तर मग हे कसे बरे करणार?, असा सवालही त्यांनी केला होता. (10k doctors died despite vaccine, says Baba Ramdev)

 

संबंधित बातम्या:

रामदेव बाबांकडून अखेर ‘ते’ वक्तव्य मागे, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

रामदेव बाबांचा पुन्हा एकदा एलोपॅथीवर निशाणा, IMA आणि फार्मा कंपन्यांना योगगुरुंचे 25 प्रश्न

आधी म्हणाले अॅलोपॅथीने लाखो लोकांचा जीव घेतला, देशभरातून टीकेनंतर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे

(10k doctors died despite vaccine, says Baba Ramdev)