Nagaland: नागालँड पेटले, गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ, सुरक्षा दलाची वाहने पेटवली

नागालँडच्या मोन जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी कथित गोळीबार केल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारातील अजून तीन जण अत्यवस्थ असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Nagaland: नागालँड पेटले, गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ, सुरक्षा दलाची वाहने पेटवली
Nagaland

कोहिमा: नागालँडच्या मोन जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी कथित गोळीबार केल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारातील अजून तीन जण अत्यवस्थ असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून प्रचंड जाळपोळ करत सुरक्षा दलाची वाहनेच पेटवून दिली. त्यामुळे नागालँडमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तर, राज्य सरकारने या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात ही घटना घडली. काल संध्याकाळी 4 वाजताची ही घटना आहे. पीडित ग्रामस्थ एका पिक-अप ट्रकमधून घरी परतत होते. ही लोकं वेळेत घरी आली नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता ही घटना उघड झाली. आपल्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह पाहिल्यानंतर ग्रामस्थांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या. या घटनेत अनेक लोक जखमी झाले. दरम्यान, या गोळीबारानंतर ग्रामस्थांनी केलेल्या हिंसेमध्ये सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार या गोळीबारात 11 लोक ठार झाले. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहन

या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मोनच्या ओटिंगमध्ये झालेली हत्या अत्यंत दुर्देवी आहे. तसेच हे कृत्य तितकच निंदनीय आहे. पीडित कुटुंबाच्या प्रती माझी सहानुभूती आहे. जखमी लोक लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना करतो. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असून न्याय देऊ. तसेच सर्वांनी शांत राहावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

शहा यांचं ट्विट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. नागालँडमधील दुर्देवी घटनेमुळे मी दु:खी आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. या घटनेची एसआयटी मार्फत राज्य सरकार चौकशी करणार आहे. दु:खी कुटुंबाला न्याय दिला जाईल, असं शहा यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

नंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस

राम के नाम, JNU पुन्हा चर्चेत, प्रशासनाच्या तीव्र विरोधानंतरही JNUSU नं डॉक्युमेंटरी दाखवली

उत्तराखंडमध्ये 18 हजार कोटी रु प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी, 10 वर्षे काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केल्याची टीका

Published On - 11:10 am, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI