AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : सैन्याच्या बंकरमध्ये अतिरेक्यांना लपवलं; पाकिस्तानचा अत्यंत खतरनाक प्लान काय?

पहलगाम हल्ल्यातील 26 निर्दोष नागरिकांच्या मृत्युने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर प्रतिबंध घातले आहेत. नियंत्रण रेषेवर (LOC) पीओकेमध्ये 42 दहशतवादी लॉन्च पॅड्स आणि प्रशिक्षण केंद्रे आढळली आहेत. यामुळे भारतात आणि पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव चिंतेचा विषय आहे.

Pahalgam Terror Attack : सैन्याच्या बंकरमध्ये अतिरेक्यांना लपवलं; पाकिस्तानचा अत्यंत खतरनाक प्लान काय?
Indian ArmyImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 29, 2025 | 12:42 PM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे. जगानेही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानचं पाणी तोडलं असून व्यापारही थांबवला आहे. मात्र, पाकिस्तानच्या कुरापती अजूनही थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानकडून अतिरेक्यांना बळ देणं सुरूच आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण एजन्सीने नियंत्रण रेषेवर (LOC) पीओके येथे 42 अतिरेकी लॉन्च पॅड्स आणि ट्रेनिंग केंद्र शोधून काढले आहेत. गुप्त माहितीच्या आधारावर अतिरेक्यांची तळं हुडकावून लावण्यात भारतीय संरक्षण एजन्सी यशस्वी ठरली आहे. या ठिकाणी 150-200 ट्रेंड अतिरेकी वेगवेगळ्या शिबिरात असून घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या लॉन्च पॅड्समध्ये केल, सरदी, दुधनियाल, अथमुकाम, जुरा, लीपा, कोटली आणि खुइरट्टा आदी ठिकाणांचा समावेश आहे. भारताकडे सडेतोड उत्तर मिळण्याच्या भीतीने दहशतवाद्यांच्या ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आल्याचंही वृत्त आहे.

वाचा: भारताच्या 3 शत्रूंनी केली पाकिस्तानशी हातमिळवणी, युद्धाच्या परिस्थितीत समर्थन देण्याची घोषणा

बंकरमध्ये शिफ्ट

इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारताकडून मोठी कारवाई होण्याच्या भीतीने पाकिस्तानी सैन्याने पीओकेमध्ये दहशतवाद्यांना पारंपारिक लॉन्च पॅड्सवरून हटवून सैन्याच्या सुरक्षित बंकरांमध्ये शिफ्ट करण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून होणारी निगराणी आणि भारताच्या संभाव्य हल्ल्यातून वाचण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांना बंकरमध्ये लपवल्याचं सूत्रांनी सांगितलं. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम पाकिस्तान करत असल्याचं स्पष्ट होत आहे. आंतरराष्ट्रीय दबाव असतानाही पाकिस्तानकडून हे कृत्य केलं जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अतिरेक्यांचे अजेंडे काय?

हिजबुल मुजाहिदीन (HM), जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लश्कर-ए-तैयबा (LeT) सारख्या संघटनांच्या एकूण 60 विदेशी अतिरेकी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असल्याचं सांगितलं जात आहे. केवळ दहशत आणि अस्थिरता निर्माण करणं हा त्यांचा हेतू आहे. त्यासोबतच 17 स्थानिक दहशतवादी सुद्धा या केंद्र शासित प्रदेशात सक्रिय आहेत. या अतिरेक्यांचा मुख्य अजेंडा भारतीय नागरिकांना टार्गेट करणं आणि जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करणं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.