छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, 4 जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, 4 जवान शहीद

रायपूर:  लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बीएसएफ जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत. शहीदांमध्ये आंध्र प्रदेशातील पी रामकृष्ण या जवानाचाही समावेश आहे.

दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत 4 जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले आहेत. बीएसएफचे जवान शोधमोहिमेवर होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. त्यावेळी जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र अचानक हल्ल्यामुळे बीएएफच्या चार जवानांना प्राण गमवावे लागले.

महला परिसरातील बीएसएफ पथक शोधमोहिमेवर गेलं होतं. या पथकात जिल्हा पथकाचे जवानही होते. हे जवान काही अंतरावर होते, त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यावेळी जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं. मात्र गोळीबारानंतर नक्षलवादी तिथून पळून गेले.

दरम्यान, कांकेर लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.


Published On - 3:59 pm, Thu, 4 April 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI