कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल, असंही केंद्र सरकारने कोर्टात सांगितलं.

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 8:04 AM

नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल, असंही केंद्र सरकारने कोर्टात सांगितलं. देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 46 हजार कोरोनाचे बळी गेले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये देण्याची शिफारस केली होती. याचसंबंधी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. इथून पुढच्या काळामध्ये ज्यांना कोरोना संसर्गाने मृत्यू होईल, त्यांच्या कुटुंबीयांना ही मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने कोर्टात दिली.

कशी असेल प्रोसेस…?

मदतीची रक्कम मिळविण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी छापील अर्ज किंवा हॉस्पिटलच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण निधी अधिकारी किंवा त्यांच्या कार्लालयात अर्ज सादर करावा लागेल.

या अर्जावर संबंधित यंत्रणेला 30 दिवसांत निर्णय घ्यावा लागेल

मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल

अर्जावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती असणार

समितीला जर अर्ज फेटाळायचा असेल तर त्याचे लेखी कारण देणं बंधनकारक

कोणत्या राज्यात किती मृत्यू?

महाराष्ट्र : 1,38,616 कर्नाटक : 37,648 तामिळनाडू : 35,379 केरळ : 23897, उत्तर प्रदेश : 22,887 दिल्ली : 20,085

कोरोनाची सद्यस्थिती काय?

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झालीय. कालच्या (22 सप्टेंबर) दिवसात देशात 26 हजार 964 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 383 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या 186 दिवसांतील निचांकावर पोहोचली आहे.

(50 thousand aid to the families of Corona victims, the Central Government informed the Supreme Court)

हे ही वाचा :

दिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी? फोटोत पुरावा

Happy Birthday Tanuja | 70च्या दशकातल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा, एका ‘थप्पड’ने सुरु झाली होती कारकीर्द!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.