AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bill Gates Quotes : बिल गेट्स यांचे 7 जगप्रसिद्ध प्रेरणादायी कोट्स, ज्यातून श्रीमंतीचा मार्ग मिळतोच

बिल गेट्स यांनी केवळ पैसाच कमावला नाही तर ते आपल्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी ठरले, या यशाचं रहस्य जगाला सांगतांना त्यांनी आपल्या आयुष्यातील सात सीक्रेट्स सांगितली आहेत.

Bill Gates Quotes : बिल गेट्स यांचे 7 जगप्रसिद्ध प्रेरणादायी कोट्स, ज्यातून श्रीमंतीचा मार्ग मिळतोच
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2025 | 5:41 PM
Share

बिल गेट्स यांना लहानपणापासूनच शिकण्याची आवड होती, ते आपल्या लहानपणी दररोज एखादी नवीन गोष्ट शिकत असत. अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी प्रोग्रामिंग करायला सुरुवात केली, आणि एक सॉफ्टवेअर तयार केलं. हार्वड विद्यापीठातील शिक्षण सोडल्यानंतर त्यांचं नवीन गोष्टी शिकण्याचं कुतुहल आजूनच वाढलं, बिल गेट्स हे यशस्वी कसे झाले, त्यांनी त्यासाठी किती कठोर परिश्रम घेतले, हे सर्वांनाच माहीत आहे, मात्र त्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अशा काही गोष्टी तरुणांना सांगितल्या आहेत, ज्यातून तुम्हाला देखील श्रीमंतीचा रस्ता दिसू शकतो, अशा काही गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

शिकत रहा – बिल गेट्स यांच्या मते माणसाने कधीही आपल्या आयुष्यात शिक्षणापासून दूर पळालं नाही पाहिजे, नेहमी नव्या गोष्टी शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे, तुम्ही ज्या तुमच्या आयुष्यात नव्या गोष्टी शिकता त्याच पुढे चालून तुमच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरतात. ज्ञान आणि शिकण्याची सवय हेच यशस्वी होण्याचं सर्वात मोठं सीक्रेट असतं असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

समस्या पासून दूर जाऊ नका – बिल गेट्स म्हणतात तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादं संकट येतं किंवा समस्या निर्माण होते, तेव्हा तुम्ही काय करता ती कशी टाळता येईल हे बघता पण तसं करू नका, त्यामुळे ती समस्या वाढेल त्याऐवजी त्या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढा, थोडा वेळ लागेल पण तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल.

भविष्याची गरज ओळखा – बिल गेट्स म्हणतात जेव्हा मी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली तेव्हा फार मोठ्या प्रमाणात कॉप्युटर नव्हेत, ठारावीक ठिकाणीच कॉप्युटर उपलब्ध होते, पण मी भविष्याची गरज ओळखली आणि त्यानुसार माझं सर्व नियोजन केलं, भविष्यातील गरजेनुसार पावलं उचलली आणि मी यशस्वी झालो. त्यामुळे सर्वात आधी भविष्याची गरज ओळखा.

कठोर परिश्रम – बिल गेट्स म्हणतात जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर कठोर परिश्रमाशिवाय दुसरा कोणताही पर्याय तुमच्यासमोर नाही, तुम्ही जेव्हा तुमचं ध्येय निश्चित कराल आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल तेव्हाच तुम्हाला त्यात यश मिळणार आहे. तुम्ही यशस्वी व्हाल.

अपयश हीच यशाची पहिली पायरी – बिल गेट्स यांच्या मते तुम्हाला येणारं प्रत्येक अपयश हे तुम्हाला भविष्यातील यशासाठी तयार करत असते, त्यामुळे खचून जाऊ नका, प्रयत्न करत रहा.

गरजूंना मदत करा – बिल गेट्स यांनी आतापर्यंत आपल्या संपत्तीमधील कोट्यवधी रुपये दान केले आहेत. ते म्हणतात गरजूंना मदत करणं हाच खरा धर्म आहे.

अलर्ट रहा – बिल गेट्स म्हणतात माणसानं सतत अलर्ट राहिलं पाहिजे, संधी तुमच्या नशि‍बाचा दरवाजा कधी ठोठावेल हे सांगता येत नाही, असं गेट्स यांनी म्हटलं आहे.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.