AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुगारात बायको हरला, दिर-सासऱ्यासह नातेवाईकांनी तिच्या शरीराचे लचके तोडले, धक्कादायक घटनेने देश हादरला

Gangrape News : एका महिलेने पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केला आहे. नातेवाईकांसह 8 लोकांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जुगारात बायको हरला, दिर-सासऱ्यासह नातेवाईकांनी तिच्या शरीराचे लचके तोडले, धक्कादायक घटनेने देश हादरला
Gangrape crime
| Updated on: Nov 17, 2025 | 10:24 PM
Share

देशातील गुन्हेगारीच्या घटना थांबायला तयार नाहीत. अशातच आता उत्तर प्रदेशातील बागपत येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केला आहे. या महिलेचे लग्न एका वर्षापूर्वी झाले होते. तिचा पती लग्नावेळी मिळालेल्या हुंड्यामुळे नाराज होता, तसेच त्याला जुगाराचेही व्यसन होते. लग्नानंतर या महिलेला नरक यातना भोगाव्या लागल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महिलेवर अत्याचार

पीडित महिलेने आरोप केला आहे की, तिच्या पतीला जुगार खेळण्याचे व्यसन होते. पैसे संपल्यांनंतर एके दिवशी त्याने जुगारात पत्नीला लावले आणि तो हरला. यानंतर 8 पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. यात सासरा, दोन दीर आणि इतर नातेवाईकांचाही समावेश आहे. आता ती न्यायासाठी भटकताना दिसत आहे. तिने पोलीस अधिक्षकांची भेट घेत आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आरोपींमध्ये नातेवाईकांचाही समावेश

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न 24 ऑक्टोबर 2024 रोजी मेरठमधील खिवई गावातील दानिशशी झाले होते. मात्र लग्न झाल्यापासून तिला त्रास सहन करावा लागत आहे. दानिशला दारू आणि जुगाराचे व्यसन आहे, एके दिवशी तो जुगारात पत्नी हरला. यानंतर महिलेने आरोप केला की, 8 पुरूषांनी माझ्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. गाझियाबादमधील तीन पुरूष होते, ज्यांना मी ओळखत होती. मला सर्वात जास्त धक्का तेव्हा बसला जेव्हा नातेवाईकांनी आणि सासऱ्यांना माझ्यावर अत्याचार केले.

मला धमकी देण्यात आली

पीडितेने म्हटले की, मला सासरच्या लोकांनी सांगितले की, जर हुंडा आणला नाही तर तिला प्रत्येक आज्ञा पाळावी लागेल आणि त्यांना खूश करावे लागेल. मी गर्भवती होते तेव्हा कुटुंबाने मला गर्भपात करायला लावला. माझ्या पायावर अ‍ॅसिड ओतण्यात आले. तसेच मला मारण्यासाठी नदीत ढकलण्यात आले, मात्र माझा जीव वाचला. मी माझ्या पालकांच्या घरी पोहोचले, त्यांनी मला आसरा दिला. आता पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.