कोहली आणि धोनी यांच्या मुलींबद्दल विकृत कमेंट करणाऱ्यांना धडा
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्वीटरवर पोस्ट करीत म्हटले आहे की अशा प्रकारे जर एखादा खेळाडू आवडत नसेल तर त्यांच्या लहान मुलींना शिवीगाळ करणे कितपत उचित आहे.

दिल्ली : देशातील आघाडीचे लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली ( VIRAT KOHLI ) आणि महेंद्रसिंग धोनी ( M.S. DHONI ) यांच्या लहान मुलींविरोधात समाजमाध्यमांवर विकृत कमेंट करण्यात आल्या होत्या. त्याची दखल दिल्लीच्या महिला आयोगाने घेतली आहे. तसेच या प्रकरणी दिल्ली पोलीसांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
भारतीय हे प्रचंड क्रिकेट वेडे असून क्रिकेट येथे तरूणांचे जीव की प्राण आहे. क्रिकेटपटूंच्या मैदानावरील तूफान कामगिरीमुळे हे क्रिकेट खेळाडू रातोरात स्टार होतात. तर त्यांच्या अपयशामुळे त्यांना टीकेचेही धनी व्हावे लागते. परंतू अलिकडे समाजमाध्यमावर काही वेळा टीका करताना भान पाळले जात असल्याचे उघडकीस आले आहे.
विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अवघ्या दोन आणि सात वर्षांच्या मुलींबद्दलही समाजमाध्यमावर अश्लाघ्य भाषेत टीपण्णी केली जात असल्याचे उघडकीस आले होते.
जिस तरह कोहली और धोनी की बच्चियों के बारे में भद्दी टिप्पणियाँ ट्विटर पर की जा रही हैं उसी तरह #RohitSharma की पत्नी और बच्ची को भी अभद्रता का निशाना बनाया जा रहा है। चल क्या रहा है ये ? @Delhipolice @MumbaiPolice pic.twitter.com/dZHKz5BD9A
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 12, 2023
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्वीटरवर पोस्ट करीत म्हटले आहे की अशा प्रकारे जर एखादा खेळाडू आवडत नसेल तर त्यांच्या लहान मुलींना शिवीगाळ करणे कितपत उचित आहे. त्यामुळे अशा लोकांना शोधून त्यांच्या पोलीसांनी एफआयआर दाखल करीत कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या त्यांच्या पावलाबद्दल समाजमाध्यमावर पाठींबा दर्शविण्यात येत आहे. आहे.
