सूरत बलात्कार व हत्या प्रकरण: आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा, पीडित कुटुंबाला 20 लाख रुपयांची भरपाई

सुरतच्या पांडेसरा पोलीस स्टेशन हद्दीतील दिवाळीच्या रात्री वडोद येथील घराजवळून अडीच वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. मुलीचा शोध सुरु असताना पोलिसांना तब्बल 48 तासांनंतर घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या मोकळ्या शेतातील झुडपातून मुलीचा मृतदेह सापडला होता.

सूरत बलात्कार व हत्या प्रकरण: आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा, पीडित कुटुंबाला 20 लाख रुपयांची भरपाई
सूरत बलात्कार व हत्या प्रकरण: आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 4:21 PM

सूरत : अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबाला 20 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुड्डू यादव असे फाशी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एफआयआर नोंदवल्यापासून 29 दिवसांच्या आत न्यायालयात खटला संपल्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, असे सूरत न्यायालयाचे मुख्य सरकारी वकील नयन सुखडवाला यांनी सांगितले. हा बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचा विजय असल्याचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी म्हटले आहे.

सुरतच्या पांडेसरा पोलीस स्टेशन हद्दीतील दिवाळीच्या रात्री वडोद येथील घराजवळून अडीच वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र शोधाशोध करूनही सापडत नसल्याने त्यांनी पांडेसरा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. मुलीचा शोध सुरु असताना पोलिसांना तब्बल 48 तासांनंतर घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या मोकळ्या शेतातील झुडपातून मुलीचा मृतदेह सापडला होता.

सीसीटीव्ही फुटेजमुळे घटना उघडकीस

मुलीचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. यासंदर्भात पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यात एका फुटेजमध्ये एक व्यक्ती मुलीला आपल्या मांडीवर बसवून घेऊन जात असल्याचे दिसत होते, ज्याच्या आधारे पोलिसांनी दोन मुलांचा बाप असलेल्या गुड्डू यादव याला अटक केली. आरोपीच्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणात पॉर्न व्हिडिओही आढळले आहेत.

246 पानांचे आरोपपत्र दाखल

सुरतच्या पांडेसरा पोलीस ठाण्याने 15 नोव्हेंबरला सूरत कोर्टात आरोपींविरुद्ध 246 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयात सुनावणी सुरू झाली, त्याअंतर्गत पोलिसांनी या खटल्यातील 65 साक्षीदारांची यादी न्यायालयाला दिली होती, त्यापैकी 42 साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष दिली.

गुजरातमध्ये गेल्या दोन महिन्यांत चार मुलींवर बलात्कार

दरम्यान गुजरातमध्ये गेल्या दोन महिन्यांत 4 लहान मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी 3 प्रकरणांमध्ये गुजरात सरकारच्या गृहविभागाच्या आदेशानंतर अवघ्या 10-12 दिवसांत दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर डे-टुडे हिअरिंग करीत प्रकरणाची सुनावणी झाली. गृहराज्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, आतापर्यंत 3 प्रकरणांमध्ये न्यायालयाने महिनाभरात शिक्षा सुनावली आहे. तर चौथ्या प्रकरणावर सुनावणी सुरू असून लवकरच न्यायालय याप्रकरणी शिक्षा जाहीर करणार आहे.

पोलीस आयुक्तांकडून निर्णयाचे कौतुक

दोषी आरोपी गुड्डू यादवला अवघ्या 29 दिवसांत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुरतचे पोलीस आयुक्त अजय तोमर यांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे. दुसरीकडे, पीडित मुलीच्या वडिलांनीही जलद न्याय मिळाल्याबद्दल सरकारी वकील आणि पोलिसांचे कौतुक केले आहे. एवढ्या लवकर न्याय मिळेल यावर विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. (Accused sentenced to death in Surat rape and murder case)

इतर बातम्या

Latur Murder | जन्मदात्रीकडून दोन वर्षांच्या मुलाची विहिरीत फेकून हत्या, लातूरमध्ये धक्कादायक घटना

बाबा-आत्यासमोरच तरुणाचे काकावर सपासप वार, अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.