बाबा-आत्यासमोरच तरुणाचे काकावर सपासप वार, अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू

तिघा बापलेकांनी निवृत्ती पाटलांना बोअरवेलच्या पाईपलाईनचे काम करण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी एका पुतण्याने निवृत्ती यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे

बाबा-आत्यासमोरच तरुणाचे काकावर सपासप वार, अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड

पनवेल : जमिनीच्या वादातून पुतण्याने सख्ख्या काकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात घोट गावात हा प्रकार घडला. पुतण्याने धारदार शस्त्राने काकावर सपासप वार केले होते. अतिरक्तस्रावामुळे काकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात मयत व्यक्तीच्या सख्ख्या भावासह एकूण तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती बाबू पाटील असं मयत काकाचं नाव आहे. वडील आणि आत्याच्या समोरच तरुणाने काकावर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील घोट येथील सुनंदा कोळेकर, त्यांचा भाऊ निवृत्ती पाटील आणि त्यांचा मुलगा निरंजन पाटील असे तिघे गावातील पिंपळपाडा येथील चाळीच्या मागच्या बाजूला बोअरवेलच्या पाईपलाईनचे काम करत होते. यावेळी मोठा भाऊ बाळाराम पाटील आणि त्याची दोन मुलं नितीन पाटील आणि मनोज पाटील तिथे आली.

नेमकं काय घडलं?

तिघा बापलेकांनी निवृत्ती पाटलांना बोअरवेलच्या पाईपलाईनचे काम करण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी एका पुतण्याने निवृत्ती यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. वडील आणि आत्याच्या डोळ्यांदेखतच हा प्रकार घडला. अतिरक्तस्रावामुळे काकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

तिघा जणांंवर गुन्हा

हत्ये प्रकरणी निवृत्ती पाटील यांचा सख्खा मोठा भाऊ बाळाराम बाबू पाटील, त्यांचा मुलगा नितीन बाळाराम पाटील आणि मनोज बाळाराम पाटील या तिघा आरोपींच्या विरोधात तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Chandrapur Murder | डोक्यात जोरदार प्रहार, 35 वर्षीय महिलेची नदीकाठी हत्या, तीन मुलं पोरकी

कौटुंबिक कलह घेऊन पोहोचला ठाण्यात, तिथेच ह्रदविकाराच्या झटक्यानं युवकाचा मृत्यू

आधी धमकावून कबर खणायला लावली, नंतर गोळ्या झाडून त्यातच पुरला तरुणीचा मृतदेह

Published On - 2:31 pm, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI