AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभेत जया बच्चन पुन्हा भडकल्या, व्हिडिओ व्हायरल… यापूर्वी सभापती जगदीप धनखडसोबत भिडल्या होत्या

जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या, चित्रपट उद्योगात अनेक गरीब लोकही काम करतात. अनेक जण रोजंदारीवर काम करतात. परंतु अर्थसंकल्पात करमणूक करात कोणतीही कपात न केल्यामुळे या लोकांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अर्थमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन त्यांना वाचवण्यासाठी काहीतरी करावे, अशी माझी विनंती आहे.

राज्यसभेत जया बच्चन पुन्हा भडकल्या, व्हिडिओ व्हायरल... यापूर्वी सभापती जगदीप धनखडसोबत भिडल्या होत्या
Jaya Bachchan
| Updated on: Feb 13, 2025 | 6:50 PM
Share

Jaya Bachchan: समाजवादी पक्षाच्या खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा संसदेत पार चढत असल्याचे प्रकार यापूर्वी घडले होते. आता पुन्हा राज्यसभेत जया बच्चन चांगल्याच भडकल्या. बॉलीवूड हा देशातील सर्वाधिक कर भरणारा उद्योग असल्याचे जया बच्चन यांनी सांगितले. त्यावेळी दुसऱ्या बाजूला बसलेल्या भाजप खासदाराने त्यावर आक्षेप घेतला. यावर जया बच्चन संतापल्या. जया बच्चन यांना अर्थसंकल्पात फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीच तरतुद नसल्याचा मुद्या उपस्थित केला होता.

काय घडले राज्यसभेत?

जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या, चित्रपट उद्योगात अनेक गरीब लोकही काम करतात. अनेक जण रोजंदारीवर काम करतात. परंतु अर्थसंकल्पात करमणूक करात कोणतीही कपात न केल्यामुळे या लोकांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अर्थमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन त्यांना वाचवण्यासाठी काहीतरी करावे, अशी माझी विनंती आहे. हा एकमेव उद्योग संपूर्ण भारताला जोडतो. यावर दुसऱ्या बाजूने कोणीतरी आक्षेप घेतला. जया बच्चन यांना हे आवडले नाही. त्या खासदारावर चांगल्याच भडकल्या. त्यांनी ओरडून विचारले, मी किती कर भरतो हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? आऊट ऑफ टर्न बोलू नका. तुम्ही फालतू बोलत आहात.

सभापतींना जया बच्चन यांना फटकारले

जया बच्चन यांचा पार चढल्यावर सभापतींच्या खुर्चीवर असलेल्या किरण चौधरी यांनी जया बच्चन यांना फटकारले. त्यांना अशी भाषा न वापरण्यास सांगितले. यावर जया बच्चन म्हणाल्या की, माझा संयम गमावल्याबद्दल मी खेद व्यक्त करत आहे. पण मला अशा मूर्खपणा स्वीकाराचा नाही. जया बच्चन यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर युजर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

मागील वर्षी 5 ऑगस्ट रोजी संसदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पतीचे नाव घेतल्याने जया बच्चन संतप्त झाल्या होत्या. त्यांनी सभापती जगदीप धनखड यांच्याशी शाब्दीक चकमक केली होती. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना त्यांचे पूर्ण नाव जया अमिताभ बच्चन असे घेतल्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.