मुंबई : छत्तीसगड उच्च न्यायालयाने गुरुवारी (26 ऑगस्ट) वैवाहिक बलात्काराबाबत वादग्रस्त निर्णय दिला. त्यानंतर आता देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आता इतकंच ऐकायचं राहिलं होतं असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. तापसीने न्यायालयाच्या निर्णयावर ट्विट करत आपली भूमिका मांडली. दुसरीकडे प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने देखील या निर्णयावर संताप व्यक्त केलाय.