AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लॉन्च; अदानी इंटरप्रायजेसकडून शुभारंभ

अदानी इंटरप्रायजेसने भारतातील पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लाँच केला आहे. हा ट्रक कोळसा वाहतुकीसाठी वापरला जाईल आणि त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल. हा ट्रक 200 किलोमीटर पर्यंत 40 टन माल वाहू शकतो. छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांनी या ट्रकचे उद्घाटन केले.

भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लॉन्च; अदानी इंटरप्रायजेसकडून शुभारंभ
हायड्रो पॉवर्ड ट्रकला हिरवा झेंडा दाखवताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय. सोबत अदानी इंटरप्रायजेसच्या नॅचरल रिसोर्सेसचे सीईओ आणि डायरेक्टर डॉ. विनय प्रकाश. Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 10, 2025 | 4:19 PM
Share

अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी इंटरप्रायजेसने भारतातील पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लॉन्च केला आहे. क्लीन ट्रान्सपोर्टेशनला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं जातं. हा हायड्रोजन-प्रेरित ट्रक हळूहळू कंपनीच्या लॉजिस्टिक संचालनात वापरल्या जात असलेल्या डीजल वाहनांना बदलणार आहे.

अदानी इंटरप्रायजेस एक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्राद्योगिकी कंपनी तसेच एक प्रमुख ऑटो निर्मात्याच्या सहकार्याने हायड्रोजन फ्यूल सेल बॅटरी ऑपरेटेड ट्रकांचा विकास करत आहे. प्रत्येक ट्रकमध्ये स्मार्ट टेक्निक आणि तीन हायड्रोजन टँक लावलेले आहेत. या टँकमधून 40 टनपर्यंतचा माल 200 किलोमीटरच्या अंतरापर्यंत घेऊन जाऊ शकतो.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ

10 मे रोजी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी रायपूरमध्ये पहिल्या हायड्रोजन ट्रकला हिरवा झेंडा दाखवला. हा ट्रक राज्य पॉवर प्लांटपर्यंत कोळसा परिवहनसाठी वापरला जाणार आहे.

छत्तीसगड सरकार काय म्हणाले?

भारताच्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकचा शुभारंभ छत्तीसगड राज्याच्या स्थिरतेबद्दलची कटिबद्धता दर्शवते. या मोहिमेमुळे आमच्या कार्बन फुटप्रिंटला कमी करण्यास मदत होईल. उद्योगांसाठी नवीन मानक स्थापन केलं जाईल, असं छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी सांगितलं.

अदानी समूहची स्थिरतेबद्दलची बांधिलकी

हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकांसाठीचा हा पुढाकार अदानी समूहाच्या डीकार्बोनायझेशन आणि जबाबदार खनन याबद्दलच्या बांधिलकीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही स्वयंचलित डोजर पुश तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, डिजिटल उपाययोजना आणि झाडांचे पुनर्स्थापन अशा उपायांचा समावेश करत आहोत, असं अदानी इंटरप्रायजेसच्या नॅचरल रिसोर्सेसचे सीईओ आणि डायरेक्टर डॉ. विनय प्रकाश यांनी सांगितलं.

 hydrogen-powered truck

hydrogen-powered truck

हायड्रोजनची शक्ती आणि पर्यावरणीय फायदे

हायड्रोजन हा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा घटक असून तो कोणताही हानिकारक उत्सर्जन करत नाही. हायड्रोजन इंधन सेलवर चालणारी वाहने डिझेल ट्रकइतकीच रेंज आणि भारवाहन क्षमता प्रदान करतात, पण केवळ जलवाष्प आणि गरम हवा उत्सर्जित करतात, तसेच त्यांचा आवाजही अत्यल्प असतो.

अदानी नॅचरल रिसोर्सेसचं आणखी एक पाऊल

ही योजना अदानी नॅचरल रिसोर्सेस (ANR) आणि अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) यांच्यातील एक संयुक्त उपक्रम आहे. ANR हायड्रोजन सेल्सची पूर्तता करेल, तर ANIL हायड्रोजन, वाऱ्याचे टर्बाइन, सौर पॅनेल आणि बॅटरी निर्मितीत कार्यरत आहे.

ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

हा उपक्रम भारताच्या ऊर्जा सुरक्षेचा आणि आत्मनिर्भरतेचा एक महत्त्वाचा भाग ठरेल, तसेच देशाचा कार्बन फूटप्रिंट कमी करेल आणि कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबन कमी करेल.

अदानी नॅचरल रिसोर्सेस विषयी

अदानी नॅचरल रिसोर्सेस (ANR) हे अदानी इंटरप्रायजेसचे एक व्यावसायिक विभाग आहे, जे कोळसा, खनिजे आणि धातूंचे उत्पादन आणि प्रक्रिया करते. ANR चे उद्दिष्ट भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या गरजा पूर्ण करणे आणि देशातील आर्थिक क्रियाकलापांना आत्मनिर्भर बनवणे आहे. ANR भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया येथे कार्यरत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.