AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : बड्या राज्यातील स्थानिक निवडणुकीतील बंपर विजयानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया,’झूठ की गूंज के..’

PM Narendra Modi : भाजपने काल उत्तरेतील बड्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे देशभरात जे वातावरण तयार झालय, अशा परिस्थितीत हा विजय भाजपचा आत्मविश्वास उंचावणारा आहे.

PM Narendra Modi : बड्या राज्यातील स्थानिक निवडणुकीतील बंपर विजयानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया,'झूठ की गूंज के..'
PM Narendra Modi
| Updated on: Sep 15, 2026 | 8:26 AM
Share

काल राजस्थानात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. तिथे महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांसाठी निवडणुका झाल्या होत्या. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे देशातील राजकीय हवा बदलली आहे असं म्हटलं जातं होतं. पण प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल राजकीय पंडितांना धक्का देणारे आहेत. राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. खोट्यासमोर सत्याचा विजय झालाय असं मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ‘झूठ की गूंज के सामने सत्य की विजय का प्रमाण है’ असं पीएम मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

“माझ्या कुटुंबियांच्या जनादेशामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालय की, डबल इंजिन सरकारच्या सुशासन आणि विकास धोरणांना जनतेचं पूर्ण समर्थन आहे. यामुळे राज्याची प्रगती नव्या उंचीवर घेऊन जाण्यासह जनतेच्या जीवनात समृद्धी आणण्याचा आमचा संकल्प अजून सशक्त होईल. या प्रसंगी सर्व विजयी उमेदवारांसह पक्षाच्या समर्पित आणि मेहनती कार्यकर्त्यांना माझ्या खूप-खूप शुभेच्छा” असं पीएम मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

भाजपने किती जागा जिंकल्या?

राजस्थानात आतापर्यंत जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकालात 10,210 वॉर्डपैकी भाजपने 4171 आणि काँग्रेसने 3,597 जागांवर विजय मिळवला आहे. पक्षाच्या या विजयाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कार्यकर्त्यांना समर्पित केलं आहे. भाजपचा हा विजय त्यांचा आत्मविश्वास बळकट करणारा आहे.

विरोधकांना आवाज वाढला होता

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर भाजपं बॅकफूटवर गेल्यासारखी वाटत होती. सीजेपीच्या आंदोलनामुळे भाजपला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यानंतर बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन जिथून निवडून येतात, ती जागा भाजपने गमावली. तिथून प्रशांत किशोर निवडून आले. या सर्व राजकीय घडामोडींमुळे विरोधकांना आवाज वाढला होता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे देशभरात जेन झी सोबत संवादाचे कार्यक्रम वाढले होते. एकूणच भाजपविरोधी वातावरण तापू लागलं होतं. त्याचवेळी राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल हे भाजपची ताकद आणि आत्मविश्वास बळकट करणारे आहेत.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती