Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीतून एकटेच मुंबईच्या दिशेने कूच करणार
Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. ते आज मुंबईच्या दिशेने अंतरवाली सराटीतून एकटेच कूच करणार आहेत. जरांगे यांच्या आवाहनानंतरही आम्ही मुंबईला जाऊच, यावर मराठा बांधव ठाम आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
ऊन-सावलीच्या खेळामुळे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ
या महिन्यात पावसाने उघडीप दिली असली तरी दिवसा कडकडीत ऊन पडतं आणि रात्रीच्या वेळी थंडी वाजते. या परस्पर विरोधी हवामानामुळे सध्या विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. त्याबरोबर आता गणेश उत्सव सुरुवात झाल्याने खरेदी आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी झाल्याने त्या माध्यमातून श्वसन विषयक आजार असल्याच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.
-
कल्याण- डोंबिवलीत शिवसेना-भाजप संघर्षाला नवं वळण
कल्याण- डोंबिवलीत शिवसेना-भाजप संघर्षाला नवं वळण मिळालं आहे. गणपत गायकवाड समर्थक माजी नगरसेवकानं शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेनं पलटवार केला. कल्याण पूर्वेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि भाजपचे माजी नगरसेवक अनंता पावशे शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे यांच्या आश्रमात पक्षप्रवेश झाला.
-
-
मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपचार घेण्यास दिला नकार
मनोज जरांगे पाटील यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक दाखल झालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती करण्यात आली.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
जालना- मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. ते आज मुंबईच्या दिशेने अंतरवाली सराटीतून एकटेच कूच करणार आहेत. जरांगे यांच्या आवाहनानंतरही आम्ही मुंबईला जाऊच, यावर मराठा बांधव ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील आता तिसऱ्यांदा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने मी एकटाच जाणार, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं केलं होतं.
गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी राज्यातील 27 शहरांमध्ये एकूण 132 निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचं निरीक्षण करण्यात येणार आहे. या निरीक्षणाचा कालावधी सायंकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सहा तास राहणार आहे. 15 , 19, 20 आणि 25 सप्टेंबर 2026 या दिवशी करण्यात येईल. दुसरीकडे गणेशोत्सवात निर्माण होणाऱ्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी सुमारे 900 टन निर्माल्यापासून 90 टन खत तयार केलं होतं. यंदाही निर्माल्य संकलनासाठी वेगवेगळ्या भागांत 328 निर्माल्य कलश ठेवण्याची व्यवस्था पालिकेनं केली आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Sep 15,2026 8:10 AM
