AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच पार्टीला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली नवीन पार्टी, सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत

सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'कॉकरोच पार्टी'ची चर्चा सुरु आहे. पण आता 'कॉकरोच पार्टीला' टक्कर देण्यासाठी नवीन पार्टी मैदानात उतरली आहे. नव्या पार्टीने CJP वर अनेक आरोप देखील केले आहेत. नव्या पार्टीने सीजेपीचे राजकीय संबंध असल्याचा आरोप केला आहे.

कॉकरोच पार्टीला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली नवीन पार्टी, सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत
CJP
| Updated on: May 23, 2026 | 12:24 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त कॉकरोच जनता पार्टीची चर्चा सुरु आहे… पार्टीची स्थापना झाल्यानंतर काही दिवसांतच सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे फॉलोअर्स जवळपास 21.5 मिलियन म्हणजेच 2.15 कोटींवर पोहोचले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने सोशल मीडियावर अनेक मोठ्या राजकीय पक्षांच्या फॉलोअर्सना देखील मागे टाकलं आहे. इंटरनेटवर त्याच्या जाहीरनाम्याबद्दल आणि पोस्ट्सबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. आता, याच दरम्यान, एक नवीन ‘पार्टी’ देखील सोशल मीडियाच्या मैदानात उतरली आहे आणि या नव्या पार्टीचं नाव आहे ‘ओगी जनता पार्टी’ म्हणजेच OJP.

CJP आणि OJP या दोन पाट्यांबद्दल सांगायचं झालं तर, एकीकडे कॉकरोच जनता पार्टी (CJP) बेरोजगारी, तरुणांचा संताप आणि व्यवस्थेवरील व्यंगामुळे व्हायरल झाली, तर आता ओजेपी स्वतःला तिची विरोधी म्हणून उभं करत आहे. हा संपूर्ण ट्रेंड ‘ऑगी अँड द कॉकरोचेस’ या लोकप्रिय कार्टून शोमधून प्रेरित असल्याचं सांगितलं जात.

कॉकरोच जनता पार्टी व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांत, इन्स्टाग्रामवर आणि दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील ओगी जनता पार्टीचे पोस्ट दिसू लागले. या पार्टीचा असा दावा आहे की, सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके आणि त्यांच्या कथित राजकीय संबंधांचा पर्दाफाश करत आहे. OJP ने सोशल मीडियावर अभिजीत दीपके यांची एक जुनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये 2024 चे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. OJP चे असे आरोप आहेत की, CJP स्वतःला न्यूट्रल सांगत आहे… पर पार्टीचे कनेक्शन आम आदमी पार्टीसोबत आहेत. ‘CJP ला नष्ट करणार…’

ओगी जनता पार्टीच्या वेबसाइटवरील घोषवाक्य देखील सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे: Any roach. Any size. Any species. Dead… याचा अर्थ असा होतो की, सर्व प्रकारच्या झुरळांना संपवणं हेच त्यांचं ध्येय आहे. सोशल मीडियावर लोक याला एक मजेदार राजकीय उपहास आणि मीम कल्चरचा भाग म्हणत आहेत.

एका पोस्टमध्ये, ओजेपीने भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंचा एक माँटाज शेअर केला आणि लिहिलं की, ज्या देशाने तलवारी आणि बलिदानाने स्वातंत्र्य मिळवलं, त्याच देशातील आजची तरुण पिढी स्वतःला “झुरळ” म्हणवून घेत ट्रेंड करत आहे.

सोशल मीडिया ‘मीम वॉर’

सध्या, सोशल मीडियावर CJP आणि OJP समर्थकांच्या मीम्स आणि पोस्ट्सची चर्चा सुरू आहे. काही जण याला केवळ विनोद आणि इंटरनेटवरील मनोरंजन समजत आहेत, तर काही जण यामागे राजकीय अजेंडा असल्याचं सांगत आहेत. ओजेपीने आपल्या बायोमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्याला पाठिंबा दिल्याचं नमूद केलेलं नाही आणि आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसल्याचा दावा केला आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल