नवीन लोकसभा…तर महाराष्ट्रातून 82 खासदार होतील…काय आहे हा बदल

New parliament building inauguration : नवीन संसदेचे रविवारी उद्घाटन झाले. यापूर्वी जुन्या लोकसभेत खासदारांना बसण्यासाठी जागेची मर्यादा होती. यामुळे लोकसंख्येनुसार नवीन सीमांकन झाले नव्हते. आता नवीन इमारतीत जास्त जागा करण्यात आल्या आहे. यामुळे पुन्हा सीमांकनाची चर्चा सुरु झालीय.

नवीन लोकसभा...तर महाराष्ट्रातून 82 खासदार होतील...काय आहे हा बदल
new parliament
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 5:22 PM

नवी दिल्ली : नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे पुन्हा नव्याने सीमांकनाची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनीही नवीन सीमांकनाबाबत उल्लेख केला. यापूर्वी 1976 सीमांकन झाले होते. त्यानुसार लोकसभेच्या 543 जागा आहे. आता 2026 मध्ये सीमांकन होण्याची शक्यता आहे.

काय होणार बदल

गेल्या 52 वर्षांपासून लोकसंख्येच्या आधारे सीमांकन झालेले नाही. सध्याच्या लोकसभेच्या 543 जागा 1971 च्या जनगणनेच्या आधारावर आहे. 1971 च्या जनगणनेला आधार मानून शेवटचे परिसीमन 1976 मध्ये केले गेले. त्यावेळी देशाची लोकसंख्या 54 कोटी होती. त्यानंतर देशात शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. त्यावेळी देशाची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती. 2021 ची जनगणना अजून व्हायची आहे. परंतु आता देशाची लोकसंख्या 142 कोटी झाल्याचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा
राज्य सध्याच्या जागा नवीन बदल
महाराष्ट्र ४८ ८२
उत्तर प्रदेश ८० १४७
बिहार ४० ७६
पश्चिम बंगाल ४२ ६७
आंध्र प्रदेश २५ ३७
तेलंगाना १७ २५
मध्य प्रदेश २९ ५५
तामिळनाडू ३९ ५३
राजस्थान २५ ५०
कर्नाटक २८ ४५
गुजरात २४ ४४

महाराष्ट्रात 82 जागा

1971 मध्ये प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे लोकसभेची एक जागा असा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी 543 लोकसभेच्या जागा निश्चित झाल्या. 2011 मध्ये देशाची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती. परंतु 2026 मध्ये समान जनगणनेचा आधार घेत परिसीमन केले आणि 10 लाख लोकसंख्येमागे एक जागा हे सूत्र स्वीकारले तर देशभरात एकूण 1210 जागा असतील. परंतु नवीन संसदेच्या लोकसभेत जास्तीत जास्त 888 खासदारच बसू शकतील. परिसीमनाच्या आधारे 1210 जागांसह हे समायोजित केले तर यूपीला 147 जागा मिळतील आणि महाराष्ट्राला 82 जागा मिळतील. हाच फॉर्म्युला इतर राज्यांमध्येही लागू होईल.

काय होणार बदल

सीमांकनानंतर दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये 42% जागा वाढतील. तर आठ हिंदी भाषिक राज्यांतील जागा सुमारे 84 टक्क्यांनी वाढतील. म्हणजेच दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत दुप्पट जागा. गेल्या निवडणुकीत या आठ राज्यांतून भाजपला 60 टक्के जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच नवीन सीमांकन भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.

कधी कधी झाले सीमांकन

  • देशात पहिले सीमांकन १९५१ च्या जनगणेनुसार १९५२ मध्ये झाले होते. त्यावेळी लोकसभा खासदारांची संख्या ४९४ ठरवण्यात आली.
  • दुसरे सीमांकन १९६१ च्या जणगणनेनुसार १९६३ मध्ये झाले. त्यावेळी खासदारांची संख्या वाढून ५२२ वर गेली
  • तिसरे सीमांकन १९७१ च्या जणगणेनुसार १९७३ मध्ये झाले. त्यावेळी खासदारांची संख्या ५४३ झाली.
  • त्यानंतर २००१ च्या जणगणेनुसार २००२ मध्ये सीमांकन झाले. मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही.
  • आता २०२६ मध्ये सीमांकन होणार आहे.

हे ही वाचा

नवीन मार्गांवर जाऊन नवीन कीर्तिमान होतात…मोदी यांनी दिला विरोधकांना मोठा संदेश

नवीन संसद भवनावर राज ठाकरे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, ट्विट करत म्हटलं…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.