इराणची ती एक धमकी अन् जगाला वेठीस धरलेल्या अमेरिकेनं नांगी टाकली, घाबरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला थेट युद्धाची धमकी देण्यात आली होती, कोणत्याही क्षणी युद्ध होईल अशी परिस्थिती असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे.

इराणमध्ये सध्या मोठा तणाव आहे. तेथील सरकारविरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष असून, लोक रस्त्यावर उतरले आहेत. इराणमध्ये उफाळलेल्या हिंसांचारामध्ये आतापर्यंत तेथील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून भारतानं देखील आपल्या इराणमधील नागरिकांसाठी अॅडव्हाझरी जारी केली आहे, इराणमध्ये प्रचंड तणाव आहे, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, त्यामुळे भारतीय नागरिकांनी इराण सोडून देशात परतावे अशी अॅडव्हाझरी भारतानं जारी केली आहे. भारतीय दुतावासाकडून ही अॅडव्हाझरी जारी करण्यात आली आहे. दरम्यान या सर्वांमध्ये अमेरिका आणि इराणमधील संघर्ष देखील चांगलाच वाढला आहे. इराणमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये मध्यस्थी करण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहे, हेच कारण आहे की, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. हा संघर्ष एवढा वाढला आहे की, थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धाची धमकी दिली आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प इराणच्या धमक्यांना घाबरले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता अमेरिकेनं आपल्या प्रमुख सैन्य तळावरील सैन्य आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा वापस बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सच्या एका रिपोर्टानुसार इराणसोबत अमेरिकेचा तणाव वाढला आहे, मात्र दुसरीकडे आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे, मध्य पूर्वेमध्ये तैनात असलेल्या आपल्या सर्व सैन्याला आणि कर्मचाऱ्यांना आता अमेरिकेनं परत आपल्या देशात बोलावलं आहे. इराणने अमेरिकेच्या सैन्याला आश्रय देणाऱ्या शेजारच्या देशांना इशारा दिला होता, जर अमेरिकेनं आमच्यावर हल्ला केला तर आम्ही अमेरिकेच्या सर्व सैन्य तळावर हल्ला करू, इराणच्या या धमकीनंतर आता अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी बोलावण्यास सुरुवात केली आहे, अशी बातमी समोर येत आहे. इराणकडून अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेल्या तुर्की आणि अन्य काही देशांना धमकी देण्यात आली आहे.
दरम्यान अमेरिकेनं उचललेल्या या पावलामुळे डोनाल्ड ट्रम्प हे इराणला घाबरले का? असा सवाल आता अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. जगाला टॅरिफमुळे वेठीस धरणाऱ्या व्हेनझुएलावर हल्ला करणारे, तसेच ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचं स्वप्न पहाणार्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पुर्वेतून आपलं सैन्य माघारी का बोलावं अशा प्रश्न आता उपस्थित होत आहे.