अध्यक्षपदाचा राजीनामा, आर्टिकल 15 पाहण्यासाठी राहुल गांधी थिएटरमध्ये

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका सिनेमागृहाचा आहे. नवी दिल्लीच्या पीव्हीआरमध्ये राहुल गांधी एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे सिनेमाचा आनंद घेताना दिसत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:32 PM, 4 Jul 2019

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका सिनेमागृहाचा आहे. नवी दिल्लीच्या पीव्हीआरमध्ये राहुल गांधी एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे सिनेमाचा आनंद घेताना दिसत आहेत. राहुल गांधींनी काल (3 जुलै) काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ट्विटरवरुन शेअर केला.

सोशल मीडियाच्या या जगात काहीही लपत नाही. राजीनामा दिल्याच्या दुसऱ्यादिवशी राहुल गांधींचा सिनेमागृहातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये ते अभिनेता आयुष्यमान खुराना याचा ‘आर्टिकल 15’ हा सिनेमा पाहत आहेत. विशेष म्हणजे ते इतर सामान्य लोकांप्रमाणेच हा सिनेमा पाहत असल्याने त्यांचं कौतुक केलं जात आहे. हा व्हिडीओ त्यांनी राजीनामा दिल्यानंतरचा असल्याचा दावा केला जात आहे.

राहुल गांधी हे नवी दिल्लीच्या पीव्हीआर चाणक्य या सिनेमागृहात दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा हार्ड हिटिंग ड्रामा ‘आर्टिकल 15’ पाहायला पोहोचले. मल्टीप्लेक्समध्ये राहुल गांधी हे सिनेमा एन्जॉय करताना दिसले. एका फोटोग्राफरने राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यावेळी राहुल गांधी यांनी टी-शर्ट घातलेली होती. तसेच, ते पॉपकॉर्न खातानाही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

राहुल गांधी यांनी काल (3 जुलै) एक चार पानी पत्र लिहून ट्विटरवर शेअर केलं. यामध्ये त्यांनी ते काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. तसेच, “पक्षाने आता जराही वेळ न घालवता नव्या अध्यक्षांची नियुक्ती करायली हवी. मी या प्रक्रियेत कुठेही नाही. मी आधीच माझा राजीनामी दिलेला आहे आणि आता मी पक्षाचा अध्यक्ष नाही. त्यामुळे पक्षाने लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय घ्यावा”, असंही राहुल गांधी म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

अखेर अध्यक्षपदावरुन पायउतार, राहुल गांधींचं 4 पानी पत्र जसंच्या तसं

राहुल गांधी जन्मानंतर पहिल्यांदाच कुशीत घेणाऱ्या नर्सच्या भेटीला

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षपदाच्या शर्यतीत

VIDEO : जेव्हा राहुल गांधी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची नावं विसरतात…