LIVE : पुलवामात पुन्हा हल्ला, पाच जवान शहीद

पुलवामा : जम्मू -काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये मेजरचाही समावेश आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमक अद्यापही सुरुच आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान परिसरात ही चकमक सुरु आहे. जखमी भारतीय जवानांना श्रीनगर येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या हल्ल्यात स्थानिक …

LIVE : पुलवामात पुन्हा हल्ला, पाच जवान शहीद

पुलवामा : जम्मू -काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये मेजरचाही समावेश आहे.

भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमक अद्यापही सुरुच आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान परिसरात ही चकमक सुरु आहे. जखमी भारतीय जवानांना श्रीनगर येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या हल्ल्यात स्थानिक नागरिकही मृत्यूमुखी पडला आहे.

LIVE :

  • पुलवामा हल्ल्याचा पहिला बदला, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर गाजी आणि कामरानचा खात्मा
  • पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा खात्मा, जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा दहशतवादी कामरान आणि गाजीला कंठस्नान
  • पुलवामात पहिला बदला, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, जवानांनी दहशतवादी लपलेली इमारत उडवली, सर्च ऑपरेशन सुरु
  • जम्मू-काश्मीरमधील पूँछ परिसरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन
  • शहीद जवान : मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सेवा राम, शिपाई अजय कुमार, शिपाई हरी सिंग
  • चकमकीत 55 राष्ट्रीय रायफल्सचे मेजर डोंडियाल यांच्यासह 4 जवान शहीद
  • मेजर डोंडियाल शहीद
  • हल्ल्यात स्थानिक नागरिकही मृत्यूमुखी
  • जखमी भारतीय जवानांना श्रीनगर येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती
  • पुलवामातील पिंगलान परिसरात दहशतवादी हल्ला, चार जवान शहीद, शहिदांमध्ये मेजरचाही समावेश

भारतीय जवानांनी पुलवामा येथे दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु केलं आहे. या ऑपरेशनअंतर्गतच दोन ते तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी एका ठिकाणी घेरलं. त्यावेळी दोन्ही बाजूंनी चकमक सुरु झाली. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचेच आहेत. याच दहशतवादी संघटनेच्या आदिल अमहद दार याने 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात भारतीय जवानांच्या गाडीवर हल्ला केला होता.

चारच दिवसांपूर्वी पुलवामामध्ये हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात 14 फेब्रुवारी रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *