AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agneepath Recruitment Scheme : राजस्थानमध्येही अग्निपथ! जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग ठप्प; रेल्वे स्टेशनची तोडफोड, कोटा-पाटणा एक्सप्रेस रद्द

अलवर : अग्निपथ योजनेचा (Agneepath Yojana) विरोध हा बिहारमध्ये सुरू झाला आणि तो आता उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा यासह देशातील 13 राज्यात पोहचाला आहे. तर या आंदोलनाची सर्वाधिक झळ ही बिहार, युपीला बसली असून आंदोलक युवकांनी सरकारी संपत्तीचं मोठं नुकसान केले आहे. बिहार, युपीनंतर हा विरोध राजस्थानमध्येही (Rajasthan) केला जात आहे. राज्यस्थानच्या अनेक […]

Agneepath Recruitment Scheme : राजस्थानमध्येही अग्निपथ! जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग ठप्प; रेल्वे स्टेशनची तोडफोड, कोटा-पाटणा एक्सप्रेस रद्द
राजस्थानImage Credit source: tv9
| Updated on: Jun 18, 2022 | 5:23 PM
Share

अलवर : अग्निपथ योजनेचा (Agneepath Yojana) विरोध हा बिहारमध्ये सुरू झाला आणि तो आता उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा यासह देशातील 13 राज्यात पोहचाला आहे. तर या आंदोलनाची सर्वाधिक झळ ही बिहार, युपीला बसली असून आंदोलक युवकांनी सरकारी संपत्तीचं मोठं नुकसान केले आहे. बिहार, युपीनंतर हा विरोध राजस्थानमध्येही (Rajasthan) केला जात आहे. राज्यस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तरुण अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आंदोलकांची पोलिसांशी झटापटही झाली. जयपूर, जोधपूर, अजमेर अलवरसह सहा जिल्ह्यांमध्ये हिंसक निदर्शने (Violent Demonstrations) होत आहेत. जयपूर शहरातील बेनाड रेल्वे स्थानकाची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचवेळी भरतपूरमध्ये रोडवेजच्या बसेस बंद करण्यात आल्या. बिहारमध्ये झालेल्या उग्र निदर्शनामुळे कोटा-पाटणा एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.

महामार्ग ठप्प

शनिवारी अलवर जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात झाली. बेहरोरमध्ये लष्कराच्या तयारीत असलेल्या तरुणांनी जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग जाम केला. पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी दगडफेक सुरू केली. या आंदोलनामुळे आंदोलकांची याठिकाणी तैनात पोलिसांशी झटापटही झाली. सुमारे तासभर महामार्ग ठप्प झाला होता.

महामार्गाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. झुंझुनू जिल्ह्यातही आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे. येथील चिरावा शहरात पोलिसांची आंदोलकांशी झटापट झाली. तर आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक अडवण्याचा प्रयत्न झाला.

जयपूर आणि जोधपूरमध्ये आंदोलन

अग्निपथ योजनेविरोधात तरुणांचा रोष जयपूर आणि जोधपूरमध्येही पाहायला मिळत आहे. सांगानेर, जयपूरमध्ये तरुणांनी रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. येथील बेनाड रेल्वे स्थानकात दुपारी मोठ्या संख्येने तरुणांनी अचानक घुसून तोडफोड केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तेथून तरुणांचा पाठलाग केला असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी जोधपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी तरुणांना हटकले

सीकर आणि श्रीगंगानगरमध्येही पोलिसांनी तरूणांना हटकले आहे. अग्निपथ योजना देशातील तरुणांच्या हिताची नसल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. सरकारला ते परत घ्यावे लागेल अन्यथा हिंसक आंदोलन छेडले जाईल. त्याची जबाबदारी सरकारची असेल.

शुक्रवारीही झाले जोरदार आंदोलन

एक दिवस अगोदर शुक्रवारी देखील अल्वर, भरतपूर, कोतपुतली, जोधपूर, सीकरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये युवकांनी निदर्शने केली. राजस्थानमध्ये दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी कोतपुतळी येथे बसेसच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. त्याचवेळी भरतपूर, श्रीमाधोपूरमध्ये भीषण निदर्शने झाली. भरतपूरमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. येथे शनिवारी अलवरमध्ये आंदोलन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.