AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्निवीरांसाठी गुड न्यूज; आता 25 टक्क्यांहून अधिक जवान होणार पर्मनंट, काय आहे नेमका प्लान?

Agniveer : अग्निवीर जवानांसाठी आनंदाची बातमी आहे. या जवानांना प्रशासन पर्मनंट करणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलाय

अग्निवीरांसाठी गुड न्यूज; आता 25 टक्क्यांहून अधिक जवान होणार पर्मनंट, काय आहे नेमका प्लान?
| Updated on: Jul 06, 2026 | 9:52 AM
Share

अग्नीवीरांसाठी लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. तिन्ही सशस्त्र सैन्य दलाने 4 वर्षांनंतर 25 हून अधिक अग्नीवीरांना नोकरीत कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदलाने सर्वाधिक जवान कायम करण्याची मागणी केली आहे. तर लष्कर आणि हवाई दलाने 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यापर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे. परंतु या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं नाही.

अग्निपथ योजनेत सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं होतं की, 4 वर्षांच्या सेवेनंतर मेरीटच्या आधारावर काही जवानांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव होता. यासाठी 25 टक्के अग्नीवीर जवान कायम ठेवणार असल्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीला सर्वांना अग्निपथ योजनेतून मुक्त केलं जाईल. त्यानंतर सशस्त्र दलात रुजू होऊ इच्छिणाऱ्या अग्निवीरांनाच सामील केले जाते. ही निवड मेरीटच्या आधारावर केली जाते .

अग्नीवीरांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव 

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, ‘नौदलाने सर्वाधिक अग्निवीरांना कायम करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदसाने 25 टक्क्यांहून थेट 75 टक्के अग्निवीरांना कायम करण्याचा प्रस्ताव सादर केलाय. तर लष्कर आणि हवाई दलाने 50 टक्क्यांपर्यंत अग्निवीरांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्यांच्या मागणीवर अद्याप कोणताही प्रतिक्रिया मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीरांचा 25 टक्के वाढवला नाही, तरी काही विशिष्ट युनिट्समध्ये सैनिक समाविष्ट केले जाऊ शकतात. परंतु ही मर्यादा 25 टक्क्यांपर्यंत ठेवली जाईल. गेल्या वर्षी सुमारे 70000 अग्निवीर प्रशिक्षणासाठी सैन्यात दाखल झाले. पुढील वर्षी सैन्यातील अग्निवीरांची संख्या वाढवण्यासाठी रिक्त जागा 90 हजारांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. सैन्यातील 1.8 लाख सैन्याची कमतरता दूर करण्यासाठी सैन्य तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

अग्निपथ योजना काय आहे?

2022 साली सुरू झालेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना अग्नीवीर म्हणून सशस्त्र दलांमध्ये भरती केले जाते. या योजनेमुळे तरुणांना सशस्त्र दलांमध्ये काम करण्याची संधी मिळते. या योजनेअंतर्गत अग्निवीरांची 4 वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलांमध्ये भरती केले जाते. . त्यांच्यासाठी सशस्त्र दलात एक विशेष पद दिले जाते. ते इतर पदापेक्षा वेगळे असते.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ