नवीन वर्षात एक लाख जिंका, मोदी सरकारकडून खास संधी

इनोव्हेशन आणि स्टार्टअप गावागावात पोहोचल्याने शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेती क्षेत्रात मोठी बदल होईल, असं तोमर यांनी सांगितलं.

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी अ‍ॅग्री इंडिया हॅकाथॉनच्या (Agri India Hackathon) पहिल्या संस्करणचं शुभारंभ केला. यावेळी कृषी मंत्री यांनी सांगितलं की यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल (Agri India Hackathon).

इनोव्हेशन आणि स्टार्टअप गावागावात पोहोचल्याने शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेती क्षेत्रात मोठी बदल होईल, असं तोमर यांनी सांगितलं. कृषी मंत्रालयानुसार, ‘अ‍ॅग्री इंडिया हॅकाथॉन’साठी अर्ज देण्याची 20 जानेवारीपर्यंतची आहे. दोन महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या अ‍ॅग्री इंडिया हॅकाथॉनमध्ये तीन एलिमिनेशन राऊंड होईल आणि शेवटी 24 जिंकणाऱ्यांना 1 लाख रुपयांची रोख रक्कम पुरस्कार म्हणून दिली जाईल.

कृषी क्षेत्रातील समस्यांचं समाधान होऊ शकते

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि शेती अनुसंधान परिषद (आयसीएआर) अंतर्गत येणाऱ्या पुसा येथील भारतीय शेती अनुसंधान (IARI) द्वारे आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तोमर आले होते. “कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनुसंधान आणि नवीन उपक्रमाकडे लक्ष केंद्रीत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अ‍ॅग्री इंडिया हॅकाथॉनचा सल्ला दिला होता. तसेच, शेती क्षेत्रात डिजीटल तंत्रज्ञान वापरण्याची गरज यावर जोर द्या आणि त्यांच्या मते अ‍ॅग्री इंडिया हॅकाथॉनच्या माध्यमातून शेती क्षेत्रातील समस्या सोडवल्या जाऊ शकतात”, असं तोमर यांनी सांगितलं.

शेतीशी संबंधित नवीन परिणाम

आपल्याला हे सुनिश्चित करायचं आहे की कृषी क्षेत्रात फायद्यात कसं येणार, तरुण शेतीकडे कसे आकर्षित होणार, पिकांचं भांडवल गुंतवूण कसे करावं, फर्टिलायझरचा वापर हळूहळू कमी व्हावा, सेंद्रिय शेती आणि सूक्ष्म सिंचनाकडे वेगाने वाटचाल व्हावी, शेतीचा खर्च कमी व्हावा, शेतकरी महाग पिकाच्या शेतीकडे वळाले, तंत्रज्ञानाचं पूर्ण समर्थन शेती क्षेत्राला मिळावा, उत्पादन-उप्तन्न वाढावं, असं तोमर यांनी सांगितलं (Agri India Hackathon).

शेतकऱ्यांच्या मेहनतीत काहीही कमी नाही. मात्र, आज या क्षेत्रात आणखी नव्या निती जोडण्याची गरज आहे. या दृष्टीने अ‍ॅग्री स्टार्टअपचं मोठं योगदान होऊ शकतं.

1 लाख रुपये रोकड जिंकण्याची संधी

अ‍ॅग्री इंडिया हॅकाथॉन एक अशी संधी आहे जी विद्यार्थी आणि तरुणांना त्यांच्या स्टार्टअपचं इनोव्हेशन आणि सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळेल. हे आयोजन 60 दिवसांसाठी असेल, यामध्ये देशभरात तीन हजारपेक्षा जास्त इनोव्हेटीव्ह, पाच हजारपेक्षा जास्त सहभागी, 100 पेक्षा जास्त विचारवंत, हजारपेक्षा जास्त स्टार्ट-अप आणि 50 पेक्षा जास्त स्पीकर सहभागी होतील. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 24 सर्वोत्कृष्ट इनोव्हेशन निवडल्या जातील, त्या प्रत्येकाला 1,00,000 रुपये रोख बक्षीस देण्यात येईल.

Agri India Hackathon

संबंधित बातम्या :

कोट्यवधी शेतकरी अर्ज करुनही PM Kisan Scheme पासून वंचित, आता काय करायचं?

सरकारने बंदी उठवली, कांद्याचे भाव वाढले

नववर्षाच्या मुहुर्तावर नांदेडच्या शेतकऱ्याची मेहनतीची वांगी फळाला, 40 दिवसांत 3 लाखांचा नफा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI