AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Abhijeet Dipke : महाराष्ट्राचा दीपके उद्या दिल्ली हलवू शकतो म्हणून अलर्टवर असलेल्या सरकारने मेट्रो बद्दल घेतला महत्वाचा निर्णय

CJP Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीने उद्या दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. याआधी सीजेपीचं दिल्लीत आंदोलन झालेलं त्यावेळी काय घडलेलं हे सर्वांना ठाऊक आहे. म्हणून अलर्ट मोडवर असलेल्या सरकारने दिल्ली मेट्रो बद्दल एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

CJP Abhijeet Dipke : महाराष्ट्राचा दीपके उद्या दिल्ली हलवू शकतो म्हणून अलर्टवर असलेल्या सरकारने मेट्रो बद्दल घेतला महत्वाचा निर्णय
cjp abhijeet dipke protest
| Updated on: Oct 09, 2026 | 12:22 PM
Share

दिल्लीत 10 ऑक्टोंबरला जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन DMRC ला पत्र लिहिलं आहे. या पत्रात 57 मेट्रो स्टेशन्सची एन्ट्री आणि एग्झिट गेट बंद करण्याची विनंती करण्यात आली आहे. DMRC ने या विनंतीवर काय निर्णय घेतलाय, ते अजून स्पष्ट नाहीय. दिल्लीत उद्या 10 ऑक्टोंबरला जंतर-मंतरवर प्रदर्शन होणार आहे. या आंदोलनामुळे गर्दी वाढू शकते अशी पोलिसांना भिती आहे. म्हणून दिल्ली पोलीस आधीपासूनच अलर्ट मोडवर आहेत. त्याच अंतर्गत त्यांनी मेट्रो प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

पोलिसांनी DMRC ला पत्र पाठवलय. त्यांनी मागणी केली आहे की, 57 मेट्रो स्टेशनवर प्रवेशाचे आणि बाहेर निघण्याचे मार्ग बंद करण्याची विनंती केली आहे. हे गेट बंद झाल्यास प्रवासी त्या मेट्रो स्टेशन्सवर येणार नाहीत. परिणामी मेट्रो बंद झाल्यास गर्दीच होणार नाही. 9 ऑक्टोंबर म्हणजे आज रात्री 9 वाजल्यापासून हे गेट बंद होऊ शकतात. 10 ऑक्टोंबरला परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हे गेट उघडतील. या मार्गावरुन जाणाऱ्या मेट्रोची संख्या सुद्धा कमी केली जाऊ शकते. DMRC ने यावर काय निर्णय घेतलाय ते अजून स्पष्ट नाहीय.

ही चिठ्ठी पाठवण्यात आली

8 ऑक्टोंबरला दिल्ली पोलीस ट्रान्सपोर्ट रेंजचे संयुक्त पोलीस आयुक्त रजनीश गुप्ता यांच्याकडून ही चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. चिठ्ठीत DMRC चे व्यवस्थापकीय संचालक विकास कुमार यांचं नाव आहे. हा सर्व विषय 9 आणि 10 ऑक्टोंबरला मेट्रो स्टेशनचे एन्ट्री आणि एग्जिट गेट बंद करण्याशी संबंधित आहे. याची एक कॉपी पोलीस आयुक्ताचे OSD, DMRC चे चीफ सिक्युरिटी कमिश्नर सुवाशीष चौधरी, स्पेशल सीपीचे एसओ आणि डीसीपी मेट्रो यांना पाठवण्यात आली आहे.

अनियंत्रित जमाव संवेदनशील ठिकाणी कूच करु शकतो

मेट्रो स्टेशन्स का बंद ठेवावीत, त्याचा खुलासाही चिठ्ठीत करण्यात आला आहे. पोलिसांनुसार, 10 ऑक्टोंबरला जंतर-मंतर आणि नवी दिल्लीत दुसऱ्या ठिकाणी आंदोलनं प्रस्तावित आहेत. पोलिसांना संशय आहे की, अनियंत्रित जमाव संवेदनशील ठिकाणी कूच करु शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरुन जाणाऱ्या ट्रेन्सची संख्या कमी करणं आणि गेट बंद करणं हे उपाय सुचवण्यात आले आहेत. पोलिसांनी DMRC ला संबंधित अधिकाऱ्यांना आणि स्टाफला आवश्यक सूचना देण्यास सांगितलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?