AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash : आताची सर्वात मोठी बातमी! ढिगाऱ्यात सापडला महत्त्वाचा पुरावा, अपघाताचे कारण लवकरच उलगडणार

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातात 265 लोकांचा मृत्यू झाला. यात 241 प्रवासी आणि 24 कर्मचारी होते. अपघाताच्या तपासणीसाठी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) सापडला आहे. सीव्हीआरमधील माहिती अपघाताचे कारण शोधण्यास मदत करेल. अमेरिकन एजन्सी देखील तपासात सहभागी आहे. या घटनेने देशभर शोककळा पसरली आहे.

Ahmedabad Plane Crash : आताची सर्वात मोठी बातमी! ढिगाऱ्यात सापडला महत्त्वाचा पुरावा, अपघाताचे कारण लवकरच उलगडणार
Ahmedabad Plane Crash
Updated on: Jun 13, 2025 | 5:59 PM
Share

अहमदाबादमधून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याने तब्बल 265 लोकांचा मृत्यू झाला. यात 241 प्रवासी तर 24 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी असलेल्या एका मेडिकल हॉस्टेलजवळ कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. या विमानात २३० प्रवासी, २ पायलट आणि १० कर्मचारी होते. या भीषण दुर्घटनेत १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा मृत्यू झाला. केवळ एक प्रवासी बचावला.

या विमान अपघातानंतर तात्काळ तपास सुरु करण्यात आला. एफएसएलसह इतर एजन्सींकडूनही कसून तपासणी सुरू आहे. एटीएसकडून या अपघाताची चौकशी सुरु असून त्यांना विमानाचा महत्त्वाचा भाग असलेला डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर (डीव्हीआर) सापडला आहे. ज्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) असेही म्हणतात. त्यामुळे आता नेमका अपघात का आणि कसा झाला याचा संपूर्ण उलगडा झाला आह.

डीव्हीआरच्या तपासणीतून अपघाताबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी अमेरिकन एजन्सीही मदत करणार आहे. विशेषतः बोईंग विमानाशी संबंधित तांत्रिक बाबींची तपासणी केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) म्हणजे काय?

सीव्हीआर हे एक लहान, मजबूत इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे विमानाच्या कॉकपिटमध्ये येणाऱ्या सर्व आवाजांची नोंद करते. याला ‘ब्लॅक बॉक्स’चा एक भाग मानले जाते. विमान अपघात झाल्यास संपूर्ण अपघाताची चौकशी करण्यास ते मदत करते.

सीव्हीआरचे महत्त्व काय?

सीव्हीआरमध्ये विमानाच्या कॉकपिटमधील पायलट, सह-वैमानिक आणि इतर फ्लाइट क्रू सदस्यांमधील संभाषणे रेकॉर्ड केली जातात. विमान प्रणालींमधून येणारे आवाज आणि इतर संबंधित आवाजही यात रेकॉर्ड केले जातात. एखादा अपघात झाल्यास त्या अपघाताची कारणे शोधण्यात हे रेकॉर्डिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. तपासकर्त्यांना अपघाताच्या वेळी विमानाच्या प्रणालींबद्दल आणि क्रू सदस्यांनी काय केले, याची माहिती देतो. सीव्हीआर सहसा विमानाच्या मागील बाजूस असते.

हे एक डिजिटल ऑडिओ रेकॉर्डर म्हणून काम करते. जे ध्वनी रेकॉर्ड करते आणि साठवते. सीव्हीआर रेकॉर्डिंगमधून अपघाताच्या वेळी विमानात काय घडत होते, याची सविस्तर माहिती मिळते, ज्यामुळे अपघाताची कारणे शोधण्यास मदत होते. अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.