AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता बुलेट ट्रेन फक्त गुजरातपुरतीच? महाराष्ट्रात प्रोजेक्ट लटकला?

केंद्रातील मोदी सरकार कोणत्याही परिस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, महाराष्ट्रात बुलेट ट्रेन (Bullet train) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणात उशीर होत आहे.

आता बुलेट ट्रेन फक्त गुजरातपुरतीच? महाराष्ट्रात प्रोजेक्ट लटकला?
| Updated on: Dec 27, 2020 | 3:48 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार कोणत्याही परिस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, महाराष्ट्रात बुलेट ट्रेन (Bullet train) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणात उशीर होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने मुंबई-गुजरात बुलेट ट्रेन प्रकल्पाला टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचं नियोजन केलंय. रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी ही माहिती दिली (Ahmedabad Mumbai Bullet train project may complete in two phase due to issue in land acquisition).

रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव म्हणाले, “जर महाराष्ट्र सरकारकडून बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहणात (Land Acquisition) उशीर झाला तर पहिल्या टप्प्यात अहमदाबाद ते वापी (गुजरात) दरम्यान बुलेट ट्रेन सुरु केली जाऊ शकते. जमीन अधिग्रहणाला मंजुरी मिळाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यात वापी ते वांद्रा बुलेट ट्रेन सुरु होईल.

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारसोबत जमीन अधिग्रहणाबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने पुढील 4 महिन्यात 80 टक्के जमीन अधिग्रहित करण्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय. बुलेट ट्रेनसाठीच्या जमीन अधिग्रहणात महाराष्ट्र सरकारकडून सहकार्य न मिळाल्यास बुलेट ट्रेन प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण केला जाईल.

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडोअर देशाची पहिली बुलेट ट्रेन योजना आहे. मात्र, या योजनेत जमीन अधिग्रहणाचा सर्वात मोठा अडथळा आहे. सरकारने 2024 पर्यंत या मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करण्याचा आराखडा आखलाय. अशा स्थितीत गुजरातमधील जमीन अधिग्रहणाचं काम जवळपास पूर्ण होत आलंय. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र प्रकल्प लटकण्याची चिन्हं आहेत.

हेही वाचा :

Special Report | मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, कोण नाक दाबणार, कुणाचं तोंड उघडणार?

तुमचा मेट्रो कारशेडला विरोध तर आमचा वाढवण बंदराला? मोदी-ठाकरे सरकार आमने सामने? वाचा सविस्तर

मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

व्हिडीओ पाहा :

Ahmedabad Mumbai Bullet train project may complete in two phase due to issue in land acquisition

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.