AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी मुलगी गमावली, तर कुणी बाप… आता फक्त आठवणीच शिल्लक; अहमदाबाद विमान अपघातामुळे अनेक कुटुंबांवर शोककळा

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. यात हर्षित पटेल आणि त्यांची पत्नी पूजा, संजना आणि अदनान मास्टर यांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. एकुलता एक मुलगा आणि गर्भवती सुनेचा मृत्यू झाल्याने हर्षितचे वडील हादरले आहेत. संजनाच्या आईवडिलांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुणी मुलगी गमावली, तर कुणी बाप... आता फक्त आठवणीच शिल्लक; अहमदाबाद विमान अपघातामुळे अनेक कुटुंबांवर शोककळा
Updated on: Jun 13, 2025 | 6:28 PM
Share

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर अवघ्या दोन मिनिटांत कोसळले. अहमदाबादमधील मेघानीनगर या भागात विमानाचा भीषण अपघात घडला. लंडनसाठी निघालेल्या विमानाने टेकऑफ घेताच ते कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेने अनेकांच्या आयुष्यातील आधार हिरावून घेतला असून आता फक्त आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी समोर येत आहे.

मुलगा आणि गर्भवती सुनेला गमावले

लंडनमध्ये कार्यरत असलेला हर्षित पटेल हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची पत्नी पूजा गर्भवती असल्याने ती अहमदाबादला आली होती. काही दिवस आई-वडिलांसोबत घालवल्यानंतर हर्षित आणि पूजा लंडनला रवाना होणार होते. ते विमानात चढले. पण, हे त्यांचे शेवटचे उड्डाण ठरले. विमान कोसळल्यानंतर त्यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा हर्षितच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. एकुलता एक मुलगा आणि गर्भवती सुनेला गमावल्याने त्यांना मोठा मानसिक आघात झाला. सध्या, अनिल पटेल यांनी डीएनए अहवालासाठी रक्त तपासणी केली आहे. ते आपल्या मुलाची आणि सुनेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

संजनाच्या मृत्यूने आईवडिलांवर दुःखाचा डोंगर

या अपघातात मीटिंगसाठी लंडनला निघालेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनी संजनाचाही मृत्यू झाला. संजना ही तिच्या आईवडिलांची एकुलती मुलगी होती. त्यांच्यासाठी ती जीव की प्राण होती. संजनाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिच्या पालकांना इतका मोठा धक्का बसला आहे की ते रुग्णालयात येण्याच्या स्थितीत नाहीत. संजनाच्या वडिलांचा मित्र रुग्णालयात पोहोचला. सध्या डीएनए चाचणीद्वारे संजनाची ओळख पटवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. लाडक्या लेकीला गमावल्याने संजनाच्या पालकांवर दुःख कोसळले आहे.

अनेक कुटुंबांची स्वप्ने उध्वस्त

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या ब्रिटिश नागरिक अदनान मास्टर यांचाही या भीषण अपघातात मृत्यू झाला. अदनान हे एकटेच प्रवास करत होते. कारण त्यांची पत्नी आणि ८ महिन्यांचे बाळ २१ जून रोजी लंडनला येणार होते. कायमस्वरूपी लंडनचे रहिवासी असलेले अदनान यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि लहान बाळ आहे. अपघातात अदनान यांचा मृतदेह पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. यामुळे, त्यांच्या ८ महिन्यांच्या बाळाचे डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. यामुळे अनेक जण हळहळ व्यक्त केली जात आहे. अहमदाबाद विमान अपघाताने अनेक कुटुंबांची स्वप्ने उध्वस्त झाली आहेत. या अपघातात ज्यांनी आपले कुटुंबियांनी गमावले आहेत.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.