AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash :अहमदाबाद विमान अपघातात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू? प्लेन थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले!

Ahmedabad Plane Crash : विमान अपघाताची एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे विमान एका वसतीगृहावर धडकल्याची माहिती आहे.

Ahmedabad Plane Crash :अहमदाबाद विमान अपघातात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू? प्लेन थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले!
ahmedabad plane crash
| Updated on: Jun 12, 2025 | 4:27 PM
Share

Ahmedabad Plane Crash : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. जमिनीवर आदळल्यानंतर या विमानाच्या अक्षरश: ठिकऱ्या उडाल्या आहेत. हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आहे. दरम्यान, या विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान ज्या इमारतीवर आदळले ते विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपघातात तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

वसतीगृहाच्या इमारतीवर विमान कोसळलं

मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे B-787 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र टेक ऑफनंतर अवघ्या दहा मिनिटांत या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान एका इमारतीवर आदळले आहे. मेघानी नगरात हे विमान कोसळलं आहे. याच भागात बीजे वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील वसतीगृहाच्या इमारतीवर हे विमान कोसळले आहे. या वसतीगृहाच्या वर भोजनालय आहे. याच ठिकाणी विद्यार्थी दुपारचे जेवण करायला जतात. विमान थेट वसतीगृहाच्या इमारतीवर कोसळल्यामुळे या अपघातात प्रवाशांसोबतच तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

विमानाचा मागचा भाग वसतीगृहावर लटकला

हे विमान कोसळल्यानंतर थेट बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाच्या इमारतीवर आदळलं आहे. या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. समोर आलेल्या या फोटोंमध्ये विमानाचा मागील भाग वसतीगृहाच्या इमातीवर लटकत असल्याचे दिसत आहे. तसेच विमानाच्या समोरचा भाग पूर्णपणे जळून गेला आहे.

विमानात 11 लहान मुलं तसेच 2 छोटे बाळ

सध्यातरी एनडीआएफ, पोलीस, पालिका प्रशासन हे युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे. त्यामुळे विमान कोसळल्यानंतर नेमकी जीवितहानी किती झाली आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या विमानात एकूण 11 लहान मुलं तसेच 2 छोटे बाळही होते. या विमाात भारतीय तसेच परदेशी नागरिकही होते.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी