AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranchi- Delhi Air Ambulance Crash : 8 वर्षांच्या लेकाला कधीच भेटणार नाहीत बाबा… रांची विमान अपघातात चिमुकल्याने गमावला पिता !

Air ambulance accident Dr Vikas : रांची येथून टेकऑफ केलेल्या विमानाचा चतरा येथे अपघात झाला, त्यामध्ये 7 नागरिक मृत्यूमुखी पडले. DGCA आणि AAIB च्या टीमकडून या अपघाताचा सविस्तर तपास सुरू आहे. अपघातातील मृतांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश होता, त्यांच्या मृत्यूनंतर घारतल्याव आभाळ कोसळलंय.

Ranchi- Delhi Air Ambulance Crash : 8 वर्षांच्या लेकाला कधीच भेटणार नाहीत बाबा... रांची विमान अपघातात चिमुकल्याने गमावला पिता !
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला अपघातात
| Updated on: Feb 24, 2026 | 9:59 AM
Share

गेल्या महिन्यात बारामतीत झालेल्या अपघाताने महाराष्ट्र हादरला. त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यास 5 जणांचा मृत्यू झाला. अजित दादांच्या धक्का अजून कमी होत नाहीये तोच देशात आणखी एक मोठा विमान अपघात झाला. झारखंडची राजधानी रांची येथून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एअर अँब्युलन्सचा अपघात होऊन 7 जण दगावले. चतरा जवळ सोमवारी संध्याकाळी हे विमान कोसळलं आणि मोठ्ठा स्फोट झाला, यात विमानातील एकही प्रवासी वाचला नाही. 7 ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला नाहीतर, त्याच्यासोबतकच एक डॉक्टरचाही मृत्यू झाला.

रांची येथून सव्वासातच्या सुमारास निघालेल्या विमानाचा संपर्क तुटला आणि नंतर थेट समोर आली ते विमान क्रॅश झाल्याची बातमी. यामध्ये क्रिटिकल केअर ॲनेस्थेशियाचे तज्ज्ञ डॉ.विकास गुप्ता यांच्यासह एकूण 7 जणानी जीव गमावला. या अपघातात मारले गेले डॉ. विकास गुप्ता हे मूळचे बिहारचे रहिवासी आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलासह झारखंडची राजधानी रांची येथे कचहरी क्षेत्रात रहात होते. त्यांची पत्नी एसबीआय कचहरी शाखेत कार्यरत आहे. त्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात.

एअर अँब्युलन्समधून रुग्णाला दिल्लीला नेतानाच अपघात

डॉ. विकास हे क्रिटिकल केअर ॲनेस्थेशिया क्षेत्रातील एक प्रसिद्ध डॉक्टर होते. रांचीच्या न्यायपालिका, प्रशासकीय अधिकारी आणि असंख्य प्रमुख व्यक्तींशी त्यांचे खोल आणि वैयक्तिक संबंध होते. ते रुग्णांसाठी फक्त डॉक्टर किंवा जीव वाचवणारे नव्हते तर, आपत्कालीन परिस्थितीत त्यांची कौशल्यं आणि शांत स्वभावामुळे सर्वजण त्यांचा आदर, सन्मान करायचे. लातेहारमधील चांदवा येथील रहिवासी असलेल्या संजय कुमार या भाजलेल्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी रेडबर्ड एअरवेजच्या मेडिकल इव्हॅक्युएशन विमानात डॉ विकास होते. ते त्याला घेऊन दिल्लीला जात होते. राजधानीत चांगले उपचार होतील या आशेने, रांचीच्या देवकमल रुग्णालयातून त्या रुग्णाला दिल्लीत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु खराब हवामान आणि डायव्हर्जनच्या प्रयत्नांमुळे हे विमान चतरा जिल्ह्यातील सिमरिया पोलिस स्टेशन परिसरातील घनदाट जंगलात कोसळलं अशी माहिती समोर आली आहे.

दुर्घटनेतील मृतांची माहिती व तपशील

विमानातील सर्व सातही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यांची ओळख खालीलप्रमाणे :

1) कॅप्टन विवेक विकास भगत

2) कॅप्टन सवराजदीप सिंह

3) संजय कुमार

4) डॉ. विकास कुमार गुप्ता

5) सचिन कुमार मिश्रा

6) अर्चना देवी

7) धुरु कुमार

या भयानक दुर्घटनेमुळे रांचीच्या वैद्यकीय आणि सामाजिक वर्तुळात शोकाचं वातावरण आहे. डॉ. विकास यांचे जवळचे मित्र, सहकारी आणि त्यांच्या रुग्णांचे कुटुंबीय शोकाकूल आहेत. डॉ. विकास यांचं कुटुंब, विशेषतः त्यांची पत्नी आणि लहान मुलगा यांच्यावर तर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. त्या लहान मुलाला त्याचे वडील पुन्हा भेटूच शकणार नाहीत. या दुर्घटनेमुळे, विकास यांच्या अचानक मृत्यूमुळे पुन्हा एकदा एअर अँब्युलन्स सेवांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि AAIB मधील तपास पथके ब्लॅक बॉक्स आणि हवामानशास्त्रीय घटकांची तपासणी करत आहेत.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?