मोठी बातमी! एअर इंडियाचं विमान कोसळलं, सगळीकडे धुराचे लोट
सध्या सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमादाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत.

Air India Plane Crashed : सध्या सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमादाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये फक्त धुराचे लोट दिसत आहेत. धुराचे लोट पाहून विमानाला मोठा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. अद्याप मात्र नेमकी जीवितहानी झाली का? याची माहिती मिळालेली नाही. हे विमान टेक ऑफ करतानाच कोसळलं असल्याचं बोललं जातंय. या विमानत एकूण 242 प्रवासी होते, असं सांगितलं जातंय. हे विमान लंडनला जात होतं. मात्र त्याआधीच या विमानाचा अपघात झाला.
विमान कोसळलं, बचावकार्य सुरू
अहमदाबादमधील मेघानी इथं हे विमान कोसळलं आहे. विमान कोसळण्याचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना झाली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. सध्या या परिसरात फक्त धुराचे लोट दिसत आहेत. त्यामुळे विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली असावी, असाही अंदाज लावला जात आहे.
हवाई रुग्णवाहिका पोहोचली
मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी आता हवाई रुग्णवाहिका म्हणजेच एअर अॅम्बुलन्स पोहोचलेली आहे. अहमदाबाबदच्या विमानतळावरही घडामोडी वाढल्या आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. टेक ऑफच्या वेळीच या विमानाचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. हे विमान लंडनला जात होतं.
गुजरात के अहमदाबाद में 242 यात्रियों को लेकर जा रहा एयर इंडिया का विमान दुर्घटनाग्रस्त हो गया है, राज्य पुलिस नियंत्रण कक्ष ने इसकी पुष्टि की है।
अधिक जानकारी की प्रतीक्षा है pic.twitter.com/7awqDgAWq5
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2025
रहिवासी भागात कोसळलं विमान
ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या भागात रहिवासी वस्ती आहे. अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळलं आहे. जिथे अपघात झाला, त्याच भागात अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जात आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य, आग विझविण्याचे प्रयत्न
टेक ऑफच्या अवघ्या 10 मिनिटांत हे विमान कोसळल्यानंतर आता काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. या भागात अग्निशमन दलाच्या एकूण सात गाड्या दाखल झाल्या आहेत. विमानाला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
