AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर भाजपची लस, त्यावर विश्वास कसा ठेवायचा? : अखिलेश यादव

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कोरोना लसीवरुन भाजपवर टीका करताना कोरोना लसीच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न उपस्थित केला.

ही तर भाजपची लस, त्यावर विश्वास कसा ठेवायचा? : अखिलेश यादव
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 02, 2021 | 5:01 PM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कोरोना लसीवरुन भाजपवर टीका करताना कोरोना लसीच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न उपस्थित केला. ही भाजपची लस आहे. तिच्यावर मी विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न अखिलेश यादव यांनी केला. तसेच आम्ही भाजपची कोरोना लस घेऊ शकणार नाही. लवकरच आमचं सरकार येईल आणि तेव्हा आम्ही सर्वांना मोफत लस देऊ, असं आश्वासनही यावेळी अखिलेश यांनी दिलं (Akhilesh Yadav criticize BJP over Corona Vaccine raise question).

अखिलेश यादव म्हणाले, “मी सध्या तरी कोरोना लस घेणार नाहीये. भाजपच्या कोरोना लसीवर मी विश्वास कसा ठेवावा? आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वांसाठी मोफत कोरोना लस देऊ. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही.”

यावेळी अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. समाजवादी पक्षाचं सरकार आल्यानंतर अयोध्येतील नगर पालिका कर रद्द केला जाईल, असं आश्वासनही दिलं. त्यांनी शनिवारी (2 जानेवारी) अयोध्यात जाऊन सर्व धर्मगुरुंची भेट घेत आशिर्वादही घेतले आहेत.

‘नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनात शेतकऱ्यांचं बलिदान’

अखिलेश यादव यांनी शेतकरी आंदोलनावरुनही मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आंदोलनात गाझीपूर सीमेवर एका शेतकऱ्याच्या बलिदानाची बातमी सुन्न करणारी आहे. कडकडीत थंडीत शेतकरी आपल्या जीवाचं बलिदान करत आहेत. मात्र, सत्ताधारी निर्दयी होऊन बसले आहेत. भाजपसारखा सत्तेचा अहंकार आणि निर्दयीपणा आतापर्यंत कोणतही पाहिला नाही.”

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आणि केशव मौर्या यांच्याकडून पलटवार

अखिलेश यादव यांच्या कोरोनावरील वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी जीव वाचला तर सर्व काही करता येईल असं म्हटलंय. कोरोना लसीसाठी जगभरातील संशोधकांनी रात्रंदिवस एक करुन काम केलंय. अखिलेश यादव आपल्या राजकारणाचं बुडतं जहाज वाचवण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत.”

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले, “अखिलेश यादव यांना कोरोना लसीवर विश्वास नाही आणि उत्तर प्रदेशच्या जनतेला अखिलेश यादव यांच्यावर विश्वास नाही. लसीवर प्रश्न उपस्थित करणे हा त्या संशोधकांचा अपमान आहे. यासाठी त्यांनी माफी मागायला हवी.”

हेही वाचा :

मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी, युतीचा प्रयोग करुन पाहिला : अखिलेश यादव

सपासोबत जाऊन काहीही फायदा झाला नाही : मायावती

BSPचे 7 बंडखोर आमदार निलंबित, सपाला हरवण्यासाठी भाजपलाही मतदान करणार – मायावती

Akhilesh Yadav criticize BJP over Corona Vaccine raise question

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ