AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सपासोबत जाऊन काहीही फायदा झाला नाही : मायावती

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात भाजपने सपा आणि बसपा यांचा दारुण पराभव करत दणदणीत यश मिळवलं. या पराभवानंतर आता सपा आणि बसपा यांचं खटकल्याचं चित्र आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 11 जागांसाठी होणारी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. बसपा स्वबळावर ही निवडणूक लढणार असल्याचाही अंदाज व्यक्त केला जातोय. गेल्या 10 वर्षांपासून बसपाने एकही […]

सपासोबत जाऊन काहीही फायदा झाला नाही : मायावती
| Edited By: | Updated on: Jun 03, 2019 | 4:35 PM
Share

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात भाजपने सपा आणि बसपा यांचा दारुण पराभव करत दणदणीत यश मिळवलं. या पराभवानंतर आता सपा आणि बसपा यांचं खटकल्याचं चित्र आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 11 जागांसाठी होणारी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. बसपा स्वबळावर ही निवडणूक लढणार असल्याचाही अंदाज व्यक्त केला जातोय. गेल्या 10 वर्षांपासून बसपाने एकही पोटनिवडणूक लढवलेली नाही. पण यावेळी ही भूमिका बदलण्याची शक्यता आहे.

मायावती यांनी निकालानंतर पहिल्यांदाच पक्षाची बैठक घेतली आणि युतीचा कोणताही फायदा झाला नसल्याचं सांगितलं. यादवांची मतं मिळाली नाही. जर ही मतं मिळाली असती तर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या कुटुंबातलेच लोक हरले नसते. सपाच्या कित्येक लोकांनी युतीविरोधात काम केलं. मुस्लिमांनी आपल्याला पूर्ण साथ दिली, असं मायावती म्हणाल्या.

उत्तर प्रदेशातील अनेक आमदार खासदार म्हणून निवडून गेले आहेत. दोन्ही सभागृहांसाठी निवड झाल्यानंतर एक जागा रिक्त करणं अनिवार्य आहे. रिक्त जागेवर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेतली जाते. उत्तर प्रदेशातील अनेक आमदार हे खासदार झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे.

रामपूर सदर, जलालपूर, बलहा, जैदपूर, माणिकपूर, गंगोह, प्रतापगड, गोविंद नगर, लखनौ कँट, टुडला, इगलास, हमीरपूर या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत इथे भाजपने 71 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सपा आणि बसपाचं आव्हान असेल असा अंदाज लावला जात होता. पण भाजपने सर्व अंदाज खोटे ठरवत दणदणीत यश मिळवलं. तरीही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागा मात्र कमी झाल्या आहेत. यावेळी भाजपने 62, सपा-बसपा 15, काँग्रेस 01 आणि अपना दलने 02 जागा जिंकल्या आहेत.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.