अयोध्येत बनत असलेली मशिद शरीयतविरोधी ? मुस्लिम नेत्याचा दावा

धनीपूरमधील प्रस्तावित मशीद ही वक्फ अधिनियम आणि शरीयतविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अयोध्येत बनत असलेली मशिद शरीयतविरोधी ? मुस्लिम नेत्याचा दावा
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 2:14 PM

नवी दिल्ली: अयोध्येच्या धनीपूरमधील प्रस्तावित मशीद ही वक्फ अधिनियम आणि शरीयतविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB)चे कार्यकारी सदस्य आणि बाबरी मशिद अॅक्शन कमिटीचे संयोजक जफरयाब जिलानी यांनी हा आरोप केला आहे. मशिद किंवा मशीदीच्या जमिनीची अदलाबदली केली जाऊ शकत नाही, असं जिलानी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ( AIMPLB objects to the proposed mosque in Dhanipur, Ayodhya)

ही मशिद म्हणजे शरिया कायद्याचंही उल्लंघन आहे. कारण वक्फ अधिनियम शरीयतवरच आधारीत असल्याचंही जिलानी यांनी म्हटलंय. 13 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत AIMIM पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, असही जिलानी यांनी सांगितलं.

सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डावर सरकारी दबाव?

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य एस. क्यू. आर. इलियास यांनी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड सरकारच्या दबावात काम करत असल्याचा आरोप केलाय. मुस्लिमांनी मशिदीसाठी धनीपूरच्या जमिनीचा प्रस्ताव फेटाळला आहे. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डानं गठित केलेली मशिद ट्रस्ट ही फक्त प्रतिकात्मक रुपात तिथे मशिद बनवत असल्याचं म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अवैध कसा?

अयोध्या मशिद ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी मशिदीला होत असलेल्या विरोधावर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जमीन मिळाली आहे. मग ती अवैध कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर अनेक लोक आपल्या सोयीनुसार शरियतचे दाखले देतात. मशिद ही नमाज अदा करण्याची जागा आहे. आम्ही मशिद बनवत असू तर त्यात गैर काय? असा प्रश्नही अतहर हुसैन यांनी विचारला आहे. दरम्यान 26 जानेवारीपासून प्रस्तावित मशिद निर्माणाचं काम सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कशी असेल धनीपूरमधील मशीद?

अयोध्येपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर ही मशिद असणार आहे. नुकतेच या मशिद आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे फोटो जारी करण्यात आले आहेत.

मशिदीसह अजून काय?

मशिदीसाठी देण्यात आलेल्या 5 एकर जागेवर मशिदीची मुख्य इमारत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ग्रंथालय, कम्युनिटी किचन, म्युझियम आणि रिसर्च सेंटर बनवण्यात येणार आहे. रिसर्च सेंटरच्या निर्मितीसाठी इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनकडून जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यापीठाचे स्थापत्यशास्त्र विभागातील प्राध्यापक एसएम अख्तर यांची मदत घेण्यात आली आहे. मशिदीची इमारत ही जवळपास 15 हजार वर्ग फुटात आधुनिक शैलीत बनवली जाणार आहे. देशभरातील अन्य मशिदींपेक्षा ही इमारत वेगळी आणि आकर्षक असेल असा दावा करण्यात आला आहे.

मशिद परिसरातच वीज निर्मिती!

संपूर्ण 5 एकर परिसरात लागणारी वीज इथूनच निर्माण केली जाणार आहे. त्यासाठी खास तयारीही करण्यात आली आहे. झिरो एनर्जीवर आधारित असलेल्या इमारतीमध्ये 100 टक्के वीज ही सोलार पॅनलवर तयार केली जाणार आहे. या परिसरात हिरवळीसोबतच पाणी बचतही मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. मशिदीसह याच परिसरात अजून एक टोलेजंग इमारत बांधली जाणार आहे. त्यामध्ये एक रुग्णालय आणि प्रशासकीय भवन असेल. तर एक ग्रंथालयही असणार आहे. इथं बनवण्यात येणाऱ्या संग्रहालय आणि अभिलेखागाराची निर्मिती इतिहासकार पुष्पेश पंत यांच्या सल्ल्यानुसार केली जाणार आहे.

गरिबांना मोफत जेवण

महत्वाची बाब म्हणजे याठिकाणी गरिबांना मोफत जेवण दिलं जाणार आहे. रोज 5 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनकडून सामुहिक किचन बनवलं जाणार आहे. त्यातून रुग्णालयातील रुग्णांसह इथं येणाऱ्या गरिबांना जेवण दिलं जाईल. त्याचबरोबर परिसरातील कुपोषित मुलं आणि मातांनाही जेवण पुरवण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

राम मंदिराचं भूमिपूजन झालं, पण अयोध्येतील मशिद कशी असेल?

अयोध्येत होत असलेली मशिद कशी आहे ? वाचनालय, रूग्णालय आणि बरंच काही, स्पेशल रिपोर्ट

AIMPLB objects to the proposed mosque in Dhanipur, Ayodhya

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.