AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराचं भूमिपूजन झालं, पण अयोध्येतील मशिद कशी असेल?

धन्नीपूर इथं बांधल्या जाणाऱ्या मशिदीचं वैशिष्ट्य म्हणजे ही झिरो एनर्जी इमारत असेल. म्हणजे या मशिदीमध्ये जेवढी वीज लागेल ती सर्व इथेच सोलार पॅनलद्वारे निर्माण केली जाणार आहे. पर्यावरणाचा मुद्दा लक्षात घेत या इमारतीच्या बाहेर हिरवळीसाठी जगभरातून दूर्लभ वृक्ष आणले जाणार आहेत.

राम मंदिराचं भूमिपूजन झालं, पण अयोध्येतील मशिद कशी असेल?
| Updated on: Dec 14, 2020 | 3:37 PM
Share

अयोध्या: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. लवकरच मंदिराच्या बांधकामालाही सुरुवात होणार आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अयोध्येतच मशिदीसाठीही 5 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही मशिद कशी असेल? याची माहिती आता समोर आली आहे. अयोध्यातील धन्नीपूर इथं बांधली जाणारी मशिद आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी इकोफ्रेन्डली असणार आहे. (What will the mosque in Ayodhya look like?)

धन्नीपूर इथं बांधल्या जाणाऱ्या मशिदीचं वैशिष्ट्य म्हणजे ही झिरो एनर्जी इमारत असेल. म्हणजे या मशिदीमध्ये जेवढी वीज लागेल ती सर्व इथेच सोलार पॅनलद्वारे निर्माण केली जाणार आहे. पर्यावरणाचा मुद्दा लक्षात घेत या इमारतीच्या बाहेर हिरवळीसाठी जगभरातून दूर्लभ वृक्ष आणले जाणार आहेत. या मशिदीत एकावेळी 2 हजार मुस्लिम बांधव नमाज अदा करु शकणार आहेत.

मशिदीसह अजून काय?

मशिदीसाठी देण्यात आलेल्या 5 एकर जागेवर मशिदीची मुख्य इमारत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ग्रंथालय, कम्युनिटी किचन, म्युझियम आणि रिसर्च सेंटर बनवण्यात येणार आहे. रिसर्च सेंटरच्या निर्मितीसाठी इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनकडून जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यापीठाचे स्थापत्यशास्त्र विभागातील प्राध्यापक एसएम अख्तर यांची मदत घेण्यात आली आहे. मशिदीची इमारत ही जवळपास 15 हजार वर्ग फुटात आधुनिक शैलीत बनवली जाणार आहे. देशभरातील अन्य मशिदींपेक्षा ही इमारत वेगळी आणि आकर्षक असेल असा दावा करण्यात आला आहे.

मशिद परिसरातच वीज निर्मिती!

संपूर्ण 5 एकर परिसरात लागणारी वीज इथूनच निर्माण केली जाणार आहे. त्यासाठी खास तयारीही करण्यात आली आहे. झिरो एनर्जीवर आधारित असलेल्या इमारतीमध्ये 100 टक्के वीज ही सोलार पॅनलवर तयार केली जाणार आहे. या परिसरात हिरवळीसोबतच पाणी बचतही मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. मशिदीसह याच परिसरात अजून एक टोलेजंग इमारत बांधली जाणार आहे. त्यामध्ये एक रुग्णालय आणि प्रशासकीय भवन असेल. तर एक ग्रंथालयही असणार आहे. इथं बनवण्यात येणाऱ्या संग्रहालय आणि अभिलेखागाराची निर्मिती इतिहासकार पुष्पेश पंत यांच्या सल्ल्यानुसार केली जाणार आहे.

गरिबांना मोफत जेवण

महत्वाची बाब म्हणजे याठिकाणी गरिबांना मोफत जेवण दिलं जाणार आहे. रोज 5 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनकडून सामुहिक किचन बनवलं जाणार आहे. त्यातून रुग्णालयातील रुग्णांसह इथं येणाऱ्या गरिबांना जेवण दिलं जाईल. त्याचबरोबर परिसरातील कुपोषित मुलं आणि मातांनाही जेवण पुरवण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

Larsen & Toubro कंपनी राम मंदिर बांधणार, Tata Consultancy सल्लागार राहणार : विहिंप

‘राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान अविस्मरणीय’, चांदीची वीट स्वीकारताना राम मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी यांचे उद्गार

What will the mosque in Ayodhya look like?

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.