ब्रिटीश सरकारने 1914-1921 मध्ये ब्रिटीश भारतीय सेनेच्या सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेटची निर्मिती करण्यात आली होती. 1970 च्या दशकात पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात भारत विजयी झाल्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी ‘अमर जवान ज्योती’ स्मारकाला मूर्त स्वरूप देण्यात आले होते. भारताविरोधात लढणाऱ्या देशातील 93 हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. त्या घटनंतर दीर्घ कालखंडानंतर नरेंद्र मोदी सरकारतर्फे इंडिया गेटच्या परिसरात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आले होते. याचे उद्घघाटन 2019 मध्ये झाले होते. यावर 25 हजार 942 सैनिकांची नावे सुवर्णक्षरांनी कोरली गेली आहेत. युद्ध स्मारकाच्या भवनमध्ये सैनिकांच्या औपचारिक कार्यक्रमांचे यामध्ये स्थलांतर केले होते.
भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाचा समारंभ 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार असून 30 जानेवारी रोजी असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा कार्यक्रमही याठिकाणी होणार आहे. 23 जानेवारी रोजी इंडिया गेटवर आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या समारोप कार्यक्रमानिमित्त दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे का, 20 जानेवारीपासून देशाच्या राजधानीत ड्रोन, पॅरा ग्लायडर, हवेत उडणाऱ्या वस्तू आणि काही हवाई उड्डाणांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे आदेश 20 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत. राजधानातील महत्वाच्या संस्था आणि जनसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे कडक नियम लावले असल्याचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले.
अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलिनीकरण होणार आहे. या निर्मिती बाबत आणि आजच्या होणाऱ्या उद्घघाटनसमारंभाबाबर कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांनी ट्विवट केले आहे.
बहुत दुख की बात है कि हमारे वीर जवानों के लिए जो अमर ज्योति जलती थी, उसे आज बुझा दिया जाएगा।
कुछ लोग देशप्रेम व बलिदान नहीं समझ सकते- कोई बात नहीं…
हम अपने सैनिकों के लिए अमर जवान ज्योति एक बार फिर जलाएँगे!— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 21, 2022
संबंधित बातम्या