‘एफआरपी’ रकमेत अडकले 55 साखर कारखाने, कशामुळे होतेय वेगवेगळ्या रंगात कारखान्यांची यादी प्रसिध्द? वाचा सविस्तर

ऊसाचे गाळप सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. हंगाम मध्यावर असून गतवर्षीपेक्षा अधिकचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी दुसरीकडे राज्यातील 55 साखर कारखाने असे आहेत ज्यांनी अद्यापही 'एफआरपी' जमा केलेली नाही. एफआरपी रक्कम अदा करण्यावरुन वेगवेगळ्या रंगाची यादीत या थकीत साखर कारखान्यांची नोंदणी केली जात आहे.

'एफआरपी' रकमेत अडकले 55 साखर कारखाने, कशामुळे होतेय वेगवेगळ्या रंगात कारखान्यांची यादी प्रसिध्द? वाचा सविस्तर
यंदा ऊसाचे गाळप विक्रमी झाले असून सर्वाधिक साखरेचे उत्पादनही महाराष्ट्रातून होत आहे.
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 10:24 AM

पुणे : (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. हंगाम मध्यावर असून गतवर्षीपेक्षा अधिकचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी दुसरीकडे (Sugar Factory) राज्यातील 55 साखर कारखाने असे आहेत ज्यांनी अद्यापही (FRP) ‘एफआरपी’ जमा केलेली नाही. एफआरपी रक्कम अदा करण्यावरुन वेगवेगळ्या रंगाची यादीत या थकीत साखर कारखान्यांची नोंदणी केली जात आहे. त्यानुसार ‘एफआरपी’ थकवणाऱ्या 55 साखर कारखान्यांची नोंदी आता लाल रंगात केल्या जात आहेत. हंगाम सुरु होण्यापूर्वीच झालेल्या बैठकीत एफआरपी अदा करण्याबाबत साखर आयुक्तांनी संबंधित साखर कारखान्यांना सुचना केल्या होत्या. असे असतानाही आता 3 तीन महिन्याचा कालावधी लोटला असतानाही 55 साखर कारखांन्यानी ही रक्कम जमा केलेली नाही.

असे आहे रंगीत यादीचे गमक

‘एफआरप’ रक्कम देण्यावरुन कारखान्यांचा समावेश साखर आयुक्त कार्यालयाकडून प्रसिध्द केलेल्या यादीत केला जात आहे. ज्या साखर कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी रक्कम अदा केली आहे त्यांचा समावेश हिरव्या रंगात, ज्या साखर कारखान्यांनी 80 ते 99.99 टक्के रक्कम जमा केली आहे त्यांचा पिवळ्या रंगामध्ये आणि ज्या साखर कारखान्यांनी यापेक्षा कमी रक्कम अदा केली आहे त्यांचा समावेश लाल यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखान्यांची स्थिती काय आहे याचा अंदाज बांधून ऊस गाळपासाठी द्यायचा का नाही हे ठरवता येत असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

ती जबाबदारी शेतकऱ्यांची

सध्या हंगाम मध्यावर असला तरी कारखान्याचे गाळप अधिक प्रमाणात होण्यासाठी संचालक मंडळाकडून एक ना अनेक अश्वासने दिली जात आहेत. आश्वासने देऊन ऊसाचे गाळप वाढवणे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूकच आहे. त्याअनुशंगाने कारखान्याची स्थिती काय आहे याची माहिती होण्यासाठीच ही यादी प्रसिध्द केली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांना कोणत्या कारखान्याला ऊस घालायचे हे लक्षात येते. मात्र, असे असतानाही ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांचा असल्याचेही साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

याचीही माहिती यादीमध्ये…

साखर आयुक्त कार्यालयाकडून 15 जानेवारीपर्यंत साखर कारखान्यांची काय अवस्था आहे याबाबत माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये एफआरपी अदा करणारे साखर कारखाने, करारानुसार किती साखर कारखान्यांनी रक्कम अदा केली, नेमकी किती रक्कम शेतकऱ्यांना दिली, करारानुसार देय थकबाकी किती आहे शिवाय कारखान्यांकडे निव्वळ थकबाकी किती ही माहिती यादीमध्ये असणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या याद्यांचा प्रसार केला जात असल्याने एफआरपी बाबत पारदर्शकता येईल असा विश्वास साखर आयुक्त कार्यालयाला आहे.

संबंधित बातम्या :

केजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई

Banana Farming: बिगर मोसमी केळी लागवडीचे काय आहेत फायदे? वाचा सविस्तर

नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पर्याय शोधा-नितीन राऊत

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.