“सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी चीन धोकादायक”, टू प्लस टू चर्चेदरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला फटकारलं

भारत आणि अमेरिकेदरम्यान आज परराष्ट्र आणि संरक्षणमंत्री स्तरावर टू प्लस टू चर्चा झाली. यावेळी महत्वपूर्ण करार करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चीन धोकादायक असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी या बैठकीत केलं.

सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी चीन धोकादायक, टू प्लस टू चर्चेदरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला फटकारलं
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 12:57 PM

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका दरम्यान असलेले मैत्रिपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्ली इथं टू प्लस टू चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्री सहभागी झाले. या चर्चेदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनला चांगलंच फटकारलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चीन धोकादायक असल्याचं वक्तव्य पॉम्पिओ यांनी केलं आहे. टू प्लस टू चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी संबंध अधिक घट्ट करण्यावर भर दिला. तसंच कोरोना व्हायरस आणि चीन निर्मित अन्य धोक्यांबाबतही चर्चा झाली. (America foreign minister Mike Pompeo on china)

जगातील दोन महान लोकशाही राष्ट्र अजून जवळ येत आहेत ही चांगली बाब आहे. भारत आणि अमेरिका दरम्यान अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. ज्यात कोरोना महामारी, चीन निर्मित अन्य विषयांचा त्यात समावेश असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ म्हणाले.

BECA करारावर स्वाक्षरी

टू प्लस टू चर्चेदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बेसिक एक्सचेंज अॅन्ड कोऑपरेशन एग्रिमेंट अर्थात BECA बाबत आनंद व्यक्त केला आहे. हा करार माहितीच्या देवाणघेवाणीत एक नवा अध्याय सुरु करेल. आमच्या (भारत आणि अमेरिका)अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं आहे. आम्ही उद्योग आणि सेवा ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं राजनाथ सिंह म्हणाले. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाहीवर विश्वास असणारे देश असल्याचंही राजनाथ यांनी म्हटलंय. तर गेल्या दोन दशकात भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलंय.

काय आहे BECA करार?

दोन्ही देशांमध्ये डाटाशी संबंधित एक महत्वपूर्ण करार झाला. या कराराद्वारे भारत अमेरिकी सैन्स उपग्रहाद्वारे भौगोलिक स्थितीची योग्य माहिती प्राप्त करु शकेल. दरम्यान काल अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर आणि भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात झालेल्या बैठकीत अमेरिकेला भारतातील संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या:

भारत आणि अमेरिकादरम्यान आज ‘टू प्लस टू चर्चा’, BECA सह महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होणार

‘टू प्लस टू’ वार्तासाठी अमेरिकेचे संरक्षण आणि परराष्ट्रमंत्री भारतात दाखल, भारती-चीन तणावाच्या मुद्द्यावर होणार चर्चा

America foreign minister Mike Pompeo on china

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.