मोठी बातमी! अमेरिकेचा भारताला पाठिंबा, भारतावर हल्ला केला तर.., पाकिस्तानला दिला थेट इशारा
मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यानंतर आता अमेरिकेनं पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, ऑपरेश सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता, आज सकाळी भारताकडून पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या 15 शहरांवर 50 ड्रोन हल्ले केले, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, मात्र तरी देखील पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, पुन्हा एकदा आता पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारताच्या डिफेंस सिस्टमनं हे हल्ले परतून लावले आहेत. पाकिस्तानच्या आठ मिसाईल पाडण्यात आल्या असून, अनेक ड्रोन देखील पाडण्यात आले आहेत.
त्यानंतर भारतानं या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला केला आहे, लाहोरवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तान आणि भारतामधील तणाव प्रचंड वाढला असून, याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, अमेरिकेनं भारताला पाठिंबा दिला आहे. दहशतवाद्याच्या विरोधात आम्ही भारतासोबत आहोत, कोणत्याही कृतीला उत्तर दिलं जाईल अशी भूमिका अमेरिकेनं आता घेतली आहे, याबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे, तसेच अमेरिकेकडून पाकिस्तानला युद्ध न करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. युद्ध करू नका असं अमेरिकेनं म्हटलं आहे.
पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न
दरम्यान पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर आज हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, भाराताच्या सीमेला लागून असलेले शहर टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. मात्र भारतानं पाकिस्तानचा हा हल्ला परतून लावला आहे. पाकिस्तानचे आठ मिसाईल आणि अनेक ड्रोन पाडण्यात आले आहोत. पाकिस्ताननं भारताचे तीन राज्य पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जम्मू विद्यापीठ आणि विमानतळ पाकिस्तानच्या रडारवर होते. मात्र भारताच्या डिफेंस सिस्टमने हा हल्ला परतून लावला आहे, त्यानंतर आता भारतानं पाकिस्ताच्या लाहोरवर हल्ला केला आहे. पाकिस्ताननं पुन्हा केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर भारतानं अमेरिकेसोबत चर्चा केली, यावेळी आम्ही दहशतवादाविरोधात भारतासोबत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.
