Weather forecast : सप्टेंबर महिना धोक्याचा, हवामान विभागाच्या नव्या भाकितानं चिंता वाढली
यंदा देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला आहे, मात्र दुसरीकडे यावर्षी जगभरात तब्बल 19 चक्रीवादळं येऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशासह राज्यात यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, सामान्यपणे मान्सून महाराष्ट्रात सात जूनच्या आसपास दाखल होतो, मात्र यंदा 25 मे रोजीच राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. म्हणजेच तब्बल 12 दिवस आधी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. या वर्षी पावसाचं प्रमाण देखील चांगलं राहणार असून, सरासरी 108 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र त्यातच आता एक मोठी आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे यंदा जगभरात तब्बल 19 चक्रीवादळं येणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. या संदर्भात लाईव्ह हिंदुस्थान या वेबपोर्टनं वृत्त दिलं आहे.
यंदा जगभारत 19 चक्रीवादळं येऊ शकतात असा अंदाज अमेरिकेच्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अमेरिकन हवामान विभाग NOAA नं याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, यंदा जगभरात 19 चक्रीवादळं येण्याची शक्यता आहे, हे प्रमाणत सामान्य स्थितीपेक्षा खूप जास्त आहे. तसेच कोणत्या महिन्यामध्ये सर्वाधिक चक्रीवादळं येणार याबाबत देखील अमेरिकेच्या हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.
कोणत्या महिन्यामध्ये सर्वाधिक चक्रीवादळं?
NOAA ने दिलेल्या माहितीनुसार अटलांटिक महासागरात येणाऱ्या चक्रवादळाचा काळ सामान्यपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर असा तीन महिने असतो. मात्र यामध्ये सप्टेंबर महिना हा चक्रीवादळांसाठी जास्त अनुकूल आणि सक्रिय असतो. सप्टेंबर महिन्यात समुद्राच्या पुष्ठभागाचं तापमान हे जास्त असतं. त्यामुळे चक्रीवादाळासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते. यंदाही सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक चक्रीवादळं येण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा अटलांटिक महासागरात 19 चक्रीवादळं येऊ शकतात, सध्या परिस्थितीमध्ये 60 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातील काही चक्रीवादळं हे महाभयंकर असतील असा अंदाजही अमेरिकेच्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
संभाव्य चक्रीवादळांची नावं
एंड्रिया, बेरी, शांटल, डेक्सटर, एरिन, फर्नांड, ग्रॅबिएल, हंबर्टो, जेरी, करेन, लोरेन्जो, मेलिसा, नेस्टर, ओल्गा, पाब्लो, रेबेका, सेबास्टियन, टान्या, आणि वेंडी अशा 19 चक्रीवादळांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
