अमेरिकेतील भारतीय नोकरदार वर्गात खळबळ, आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, मोठी बातमी समोर
अमेरिकेनं H-1B व्हिसा संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला होता, नव्या निर्णयानुसार व्हिसाचं शुल्क वाढवण्यात आलं आहे, मात्र त्यानंतर आता अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली असून, नोकरदार वर्गामध्ये खळबळ उडाली आहे.

अमेरिकेनं H-1B व्हिसा संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे, नव्या निर्णयानुसार आता अमेरिकेत नोकरीसाठी आवश्यक असणारा एच -1बी व्हिसा प्राप्त करण्यासाठी तब्बल 1 लाख डॉलर अर्थात 88 लाख भारतीय रुपये मोजावे लागणार आहेत, याचा सर्वाधिक फटका हा भारताला बसला आहे, कारण भारतामधून दरवर्षी मोठ्या संख्येनं तरुण अमेरिकेत नोकरीसाठी स्थलांतर करत असतात. मात्र वाढलेल्या व्हिसा शुल्कामुळे आता अनेकांचं अमेरिकेत नोकरी करण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे.
अमेरिकेनं आपली इमिग्रेशन आणि आउटसोर्सिंग पॉलिसी एवढी कडक केली आहे, की त्यामुळे अमेरिकेमधील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवं वादळ येण्याची शक्यता आहे, जे लोक H-1B व्हिसाधारक असून, अमेरिकेत नोकरीनिमित्त राहतात त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थानिक झालेल्या भारतीयांना देखील आता ही धोक्याची घंटा वाटू लागली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेल्या आणि अमेरिकेत नोकरी करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामधून त्याची भीती स्पष्ट दिसून येत आहे.
अनेक वर्षांपासून आम्हाला कायदेशीर दर्जा प्राप्त असून देखील तसेच अमेरिकेची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी आमचं योगदान असताना देखील आता प्रचंड अस्वस्थता जाणवू लागली आहे. नोकरी जाण्याची भीती वाटत आहे, असं या कर्मचाऱ्यानं म्हटलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेनं वाढवलेलं H-1B व्हिसाचं शुल्क आहे. स्थलांतरणासाठी मोठ्या प्रमाणात H-1B व्हिसाचा दुरुपयोग होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं अमेरिकन सरकारनं म्हटलं आहे.
दरम्यान या कर्मचाऱ्याची पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे, व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे अमेरिकेत सध्या जॉब करणाऱ्या आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांना देखील आता आपली नोकरी जाण्याची भीती वाटू लागली आहे. या पोस्टमध्ये पुढे या कर्मचाऱ्यानं म्हटलं आहे की, आता असं वाटत आहे की सर्व काही संपलं आहे, आम्ही इथे खूप मेहनत केली, मात्र तरी देखील आमच्यावरच भेदभावाचे आरोप होत आहेत, आमच्या कष्टामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था आज एवढी मजबूत बनली आहे, मात्र आता आम्हाला आमची नोकरी जाण्याची भीती वाटत आहे, दरम्यान तरुणाच्या या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
