AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेची मग्रुरी उतरवण्यासाठी जनता रस्त्यावर..; अमोल कोल्हेंचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल, ‘व्होट चोरी’वर थेट सवाल

महाराष्ट्रातसुद्धा लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांदरम्यान जवळपास 60 लाख मतं वाढतात, आता SIR मध्ये पण प्राथमिकदृष्ट्या महाराष्ट्रातली काही कोटी मतं कमी होतात, मग ही मतं सोयीने वाढवली होती का, असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.

सत्तेची मग्रुरी उतरवण्यासाठी जनता रस्त्यावर..; अमोल कोल्हेंचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल, ‘व्होट चोरी’वर थेट सवाल
अमोल कोल्हेImage Credit source: Tv9
| Updated on: Oct 06, 2026 | 1:14 PM
Share

‘व्होट चोरी’च्या आरोपांवरून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत रस्त्यावर उतरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून त्यांना रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. याच आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. अमोल कोल्हे यांनी ‘व्होट चोरी’च्या आरोपांची तुलना घरातील चोरीशी केली. “आपल्या घरात चोरी झाली आणि चोर कोण आहे हे माहीत असेल, तर त्याच्यावर कारवाई व्हावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, इथे लोकशाहीत बहुमूल्य असलेलं मत चोरीला जात आहे,” असं ते म्हणाले. मतदार याद्यांमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप करत त्यांनी या सगळ्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

‘मतदार याद्यांमध्ये घोळ करूनच सत्ता येतेय का?’

मतदार याद्यांमध्ये घोळ होत असेल, तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो, असा मुद्दा अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. “मतदार याद्यांमध्ये घोळ करूनच मग ही सत्ता येतेय का?” असा थेट सवाल त्यांनी केला. तसंच या प्रकरणावर कारवाईची मागणी करताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा संदर्भ देत कोल्हे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. न्यायालयाकडून कडक ताशेरे ओढल्यानंतरही जर संबंधित प्रकरणात कारवाई होत नसेल किंवा मुख्य निवडणूक आयुक्त स्वतःहून पदाचा राजीनामा देत नसतील, तर ही बाब ‘निर्ढावलेपणा’ असल्याचं म्हणावं लागेल, असा घणाघात त्यांनी केला.

महाराष्ट्रातील मतदारसंख्येवरूनही सवाल

अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतांच्या संख्येत झालेल्या कथित वाढीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही निवडणुकांच्या काळात महाराष्ट्रात जवळपास 60 लाख मतांची वाढ झाली. आता SIR अर्थात विशेष सखोल पुनरावलोकनाच्या प्रक्रियेत प्राथमिकदृष्ट्या महाराष्ट्रातील काही कोटी मतं कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला. “जी मतं वाढली होती, तीच SIRमध्ये कमी झालेली आहेत का? ही मतं सोयीने वाढवली होती का?” असा सवाल करत या आकडेवारीचं स्पष्टीकरण जनतेसमोर स्पष्टपणे मांडण्याची मागणी त्यांनी केली.

‘सत्तेची मग्रुरी उतरवण्यासाठी जनता रस्त्यावर येईल’

या संपूर्ण कथित घोळाचं मूळ निवडणूक आयोगात असल्याचा आरोप करत कोल्हे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली. देशभरात या मुद्द्यावर आक्रोश असल्याचं सांगत त्यांनी आंदोलनाची भूमिका आणखी तीव्र केली. “ही सत्तेची मग्रुरी उतरवण्यासाठीच देशातली संपूर्ण जनता रस्त्यावर येण्यास कमी करणार नाही,” असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला. तसंच कथित मतचोरीचे आरोप समोर आल्यानंतरही भाजप त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Follow Us
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका