AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी कुटुंबियांकडून वनतारा प्रकल्पावर केला जातो तब्बल इतके कोटी खर्च, पैशांचा आकडा वाचून बसेल धक्का

महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात नेण्यात आले असून यानंतर मोठा गोंधळ निर्माण झालाय. कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीला परत आणण्याची मागणी करत आहेत. हा वनतारा प्रकल्प अनंत अंबानी यांच्याकडून चालवला जातो.

अंबानी कुटुंबियांकडून वनतारा प्रकल्पावर केला जातो तब्बल इतके कोटी खर्च, पैशांचा आकडा वाचून बसेल धक्का
Vantara
| Updated on: Aug 03, 2025 | 8:56 AM
Share

‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात नेण्यात आलंय. यामुळे एकच गोंधळ उडाला. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सध्या प्रयत्न केली जात आहेत. कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले असून वनतारामधून महादेवी हत्तीणीला परत आणण्याची मागणी करत आहेत. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात नेण्यात आलंय. हे केंद्र रिलायन्स ग्रृपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हे चालवतात. महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी प्रयत्न केली जात असतानाच आता वनताराकडून महादेवी हत्तीणीचा वनतारामधील व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

व्हिडीओमध्ये वनतारामध्ये तिच्यावर कशाप्रकारे उपचार सुरू आहेत आणि ती तिथे कशी राहत आहे, हे सर्व दाखवण्यात आलंय. अंबानींच्या या वनतारा प्रकल्पात फक्त देशच नाही तर विदेशातूनही प्राण्यांना आणले जाते आणि त्यांच्यावर उपचार केली जातात. विशेष म्हणजे उपचारानंतर त्यांना परत जंगलात सोडून दिले जाते. या वनतारा प्रकल्पात खूप मोठ्या संख्येने प्राणी आहेत. येथे प्राण्यांच्या उपचारासोबतच त्यांच्या खाण्यापिण्यावर खास लक्ष दिले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच वनताराला भेट दिली होती. एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षा हे वनतारा कमी नक्कीच नाहीये. वनतारात गेल्यावर एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखी फिलिंग नक्कीच येते. अंबानी कुटुंबियांकडून वनतारा प्रकल्पावर अत्यंत मोठा पैसा हा खर्च केला जातो. अनंत अंबानी यांचा वनतारा जामनगरमध्ये 3000 एकरमध्ये पसरलेला आहे, जिथे शेकडो प्राणी आहेत. दरवर्षी अंबानी कुटुंबियांकडून वनतारा प्रकल्पासाठी 150-200 कोटी रुपये खर्च केले जातात. 

प्राण्यांसाठी एक विशेष आहार, आंतरराष्ट्रीय पशुवैद्यकीय डॉक्टरांची टीम, वातानुकूलित वैद्यकीय युनिट, आधुनिक पुनर्वसन केंद्रे तिथे आहेत. प्राण्यांची काळजी तिथे घेतली जाते. वनतारा प्रकल्प नेमका कसा आहे आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ आपल्याला बघता येतात. कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला तिथे नेण्यात आल्याने वनतारा प्रकल्प चांगलाच चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे. कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीला परत मागत आहेत. 

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.