RSS : अन् मोहन भागवत पोहचले मदरश्यात, नेमका तो प्रसंग काय?

इलियासी यांच्या निमंत्रणावरून मोहन भागवत यांनी मदरशे आणि मशिदींना भेटी दिल्या. या दरम्यानच्या काळात त्यांनी नेमके काय केले हे देखील जाणून घेणे तेवढेच महत्वाचे आहे.

RSS : अन् मोहन भागवत पोहचले मदरश्यात, नेमका तो प्रसंग काय?
स्वंयसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत
राजेंद्र खराडे

|

Sep 22, 2022 | 8:29 PM

दिल्ली : कट्टर हिंदुत्ववादी म्हणून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची (RSS) ओळख आहे. शिवाय आरएसएस म्हणलं की आपल्यासमोर चित्र उभा राहते ते मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचेच. पण हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत हे मदरशामध्ये गेले असे सांगितले तर ते अवास्तवर वाटेल, पण मोहन भागवत हे गुरुवारी ऑल इंडिया मुस्लिम इमाम ऑर्गनायझेशनचे (All India Imam Organization) प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांना भेटण्यासाठी थेट मशिदीत गेले होते. एवढेच नाही तर त्यांनी मदरशात प्रवेश करताच त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा करण्यात आला होता. हे सर्व काल्पनिक वाटत असेल पण भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीला भेट दिली होती. शिवाय येथील मुलांशीही त्यांनी संवाद साधला

मोहन भागवत यांनी केवळ मदरशाला भेटच दिली नाहीतर परिसराची पहाणी करुन तेथील मुलांसोबत संवादही साधला. आरएसएस मधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मदरशाला भेट देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. शिवाय या एक तासांमध्ये त्यांनी मुलांशीही संवाद साधला.

इलियासी यांच्या निमंत्रणावरून मोहन भागवत यांनी मदरशे आणि मशिदींना भेटी दिल्या. याच दरम्यान एका मदरशामध्ये मोहन भागवत यांना राष्ट्रपिता असे संबोधण्यात आले. पण आपण सर्व भारत मातेचे संतान आहोत, असे मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत यांनी केवळ भेटीच दिल्या नाहीतर तेथील मुलांशी संवादही साधला. मदरशामधील मुलांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती कशी जोपासली जाते याचे देखील त्यांनी निरीक्षण केले. धर्मगुरूंचे निवासस्थान असलेल्या मशिदीत इलियासी आणि भागवत यांनी सुमारे तासभर संवाद साधला.

स्वयंसेवक संघाचे प्रमुख हे गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम बुद्धिजीवींशी चर्चा करत आहेत.या दरम्यान, भागवत यांनी हिंदूंसाठी काफिर हा शब्द वापरण्याचा मुद्दा उपस्थित केला आणि ते म्हणाले की, यामुळे चांगला संदेश जात नाही. तर काही बाबतीत मुस्लिम विचारवंतांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला होता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें