मेलेल्यांना जिवंत करणं हस्यास्पद आणि धोकादायक; अनिल देसाई असं का आणि कुणाला म्हणाले?

काल महत्त्वाचा युक्तिवाद झाला. काल काही विषयांवर युक्तिवाद होता. काल वेळ अपूर्ण होता. त्यामुळे आज पुन्हा युक्तिवाद होणार आहे. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करतील.

मेलेल्यांना जिवंत करणं हस्यास्पद आणि धोकादायक; अनिल देसाई असं का आणि कुणाला म्हणाले?
anil desaiImage Credit source: ani
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 11:19 AM

नवी दिल्ली : समता पार्टीने मशाल या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे तसा अर्जही केला आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गमावलेल्या ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह जाणार की काय? अशी चर्चा सुरू झालेली आहे. या चर्चेवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मेलेल्यांना जिवंत करणं हस्यास्पदच नाही तर लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

समता पार्टी डी रजिस्टर कशामुळे झाली? निवडणूक आयोगाने त्यावर निर्णय दिला आहे. पुन्हा समता पार्टीला जिवंत केलं जात असेल तर ते चुकीचं आहे. मेलेल्या पार्टीला जिवीत करणं हस्यास्पदच नाही तर निराशाजनक आणि धोकादायक आहे, असं अनिल देसाई म्हणाले. समता पार्टीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुणी कुणाचं अभिनंदन कराव, अदानप्रदान करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यावर बोलणं योग्य राहणार नाही, असं देसाई म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पुढचा आठवडा महत्त्वाचा

काल महत्त्वाचा युक्तिवाद झाला. काल काही विषयांवर युक्तिवाद होता. काल वेळ अपूर्ण होता. त्यामुळे आज पुन्हा युक्तिवाद होणार आहे. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करतील. आज आणि उद्या सुद्धा ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण कोर्ट ज्या पद्धतीने वेळेची आखणी करून देईल. त्यानुसार जावं लागणार आहे. विरोधी गटाच्या वकिलांचाही युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे हा आणि पुढचा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. भारताच्या लोकशाहीत झालेला हा पेचप्रसंग कसा सुटेल हे पाहावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

निर्णय व्हावा

21 तारखेपासूनच दहावी सूची लागू होते. जी घटना पहिली झाली, त्या घटनेचा न्याय अपेक्षित आहे. न्यायालयही याच क्रमाने जातं. कायदा हा त्या त्या गोष्टींना लावावा. जिथे कायद्याचं उल्लंघन झालं, तिथे कायद्याची तरतूद लावली जावी आणि निर्णय व्हावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

धक्कादायक निकाल

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयवारही आज सुनावणी होणार आहे. त्यावरही देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दुपारी सुनावणी होणार आहे. निवडणकू आयोगाचा निकाल धक्कादाय आहे. सर्वांनीच हा निकाल धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.

कुणीच आयोगाच्या निर्णयाचं समर्थन केलं नाही. सामान्य लोकांनाही हा निर्णय पटला नाही. घातक आणि धक्कादायक निकाल आहे. निवडणूक आयोग ही लोकशाहीची बूज राखणारी संस्था आहे. त्यांनीच वेगळा निकाल दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

विरोधकांना टोला

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय निस्तरणार कसा? ते निस्तरलं नाही तर लोकशाही खिळखिळी होईल. प्रत्येकजण आपआपल्या परीने कायद्याचं आकलन करत असतो. आम्ही उच्च न्यायालयात जावं असं लोक सांगतात. पण तसं असतं तर सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलं असतं, असा टोला त्यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.