AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray VS Eknath Shinde live : उद्धव ठाकरे यांना धक्का, निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगितीस नकार

| Updated on: Feb 23, 2023 | 6:02 AM
Share

Supreme Court Hearing on MLA disqualification Live Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी काल दहाव्या अनुसूचीचा दाखला देत शिंदे गटाला कोणतंही कायदेशीर संरक्षण उरत नसल्याचं म्हटलं.

Uddhav Thackeray VS Eknath Shinde live : उद्धव ठाकरे यांना धक्का, निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगितीस नकार
Supreme Court HearingImage Credit source: tv9 marathi

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी काल दहाव्या अनुसूचीचा दाखला देत शिंदे गटाला कोणतंही कायदेशीर संरक्षण उरत नसल्याचं म्हटलं. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही पदावर राहू शकत नसल्याचा युक्तिवाद केला होता. सिब्बल यांच्या हा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील कसा खोडून काढतात हे पाहावं लागणार आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यावरही आज सुनावणी होणार आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Feb 2023 04:10 PM (IST)

    ठाकरे गटाची मागणी फेटाळली

    निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार

    एक आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार

    निवडणूक आयोग व शिंदे गटाला नोटीस

    ठाकरे गटाच्या आमदारांवर दोन आठवडे कारवाई करता येणार नाही

  • 22 Feb 2023 03:45 PM (IST)

    शिवसेना धनुष्यबाण आणि पक्ष चिन्हावर सुनावणी सुरु

    शिवसेना धनुष्यबाण आणि पक्ष चिन्हावर सुनावणी सुरु

    निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात येऊ शकत नाही- नीरज कौल

    शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तीवाद

    घटनेचा १३६ चा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने येथे वापरु नये

  • 22 Feb 2023 03:43 PM (IST)

    निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुनावणी सुरु

    नवी दिल्ली :

    निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्यात यावी अशी ठाकरे गटाची याचिका

    सुनावणी सुरु

    तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तीन न्यायाधीशांच्या खंडपीठात

  • 22 Feb 2023 03:30 PM (IST)

    सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली

    सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली कपिल सिब्बल यांचा आज जबदरस्त युक्तिवाद थोड्याच वेळात निवडणूक आयोगाच्या निर्णयावरील याचिकेवर सुनावणी होणार

    तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद होणार

  • 22 Feb 2023 02:44 PM (IST)

    Maharashtra Politics Live : व्हीप राजकीय पक्ष जारी करतो, विधिमंडळ पक्ष नाही; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

    राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षात प्रतोद हा दुवा

    व्हीप जारी करण्याआधी धोरणाला विरोध कलेला जाऊ शकतो

    आसाममध्ये बसून मुख्य प्रतोद ठरवू शकत नाही

    अधिवेशनावेळी वारंवार बैठका घेऊन धोरणं ठरवली जातात

    राजकीय पक्ष म्हणजे आई, विधिमंडळ पक्ष म्हणजे बाळ

    ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

  • 22 Feb 2023 02:42 PM (IST)

    सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद

    विधिमंडळ पक्ष मुख्य प्रतोदांना आव्हान देऊ शकत नाही

    प्रतोद हे राजकीय पक्षांची भूमिका विधिमंडळात मांडतो

    ३८ जण पक्षाची धोरणे ठरवू शकत नाही

    एखाद्या धोरणाला विरोध हा व्हिप जारी करण्याआधी करतो येतो

    पक्षाचे आदेश आमदाराला पाळवे लागतात

  • 22 Feb 2023 02:30 PM (IST)

    राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षात काय आहे फरक

    राजकीय पक्षाने घेतलेले निर्णय विधिमंडळ पक्षाला बंधनकारक

    व्हीप हा फक्त राजकीय पक्ष जारी करतो, विधिमंडळ पक्ष नाही

    राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षात काय असतो फरक हे सिब्बल यांनी युक्तीवादात सांगितले

    फुटून गेलेले पक्ष राजकीय नव्हे तर विधिमंडळ पक्ष- सिब्बल

  • 22 Feb 2023 11:59 AM (IST)

    शिवसेनेच्या आधीच्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांचे पद चौथ्या क्रमांकावर होते

    नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली होती. पक्षाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरेच घेत होते

    31 ऑक्टोबर 2019 ला शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती तर शिवसेनेचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची उद्धव ठाकरे यांनीच नियुक्ती केली.

    व्हीपचा निर्णय पक्षच घेऊ शकतो, 25 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरे आमदार नव्हते. मुख्यमंत्रीही नव्हते. ते केवळ शिवसेनेचे अध्यक्ष होते.

    असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

  • 22 Feb 2023 11:36 AM (IST)

    मुख्यप्रतोद कसे निवडले जातात याचं वाचन सुरू

    सुनील प्रभू यांची निवड कशी झाली होती हे वकील सिब्बल सांगत आहेत

    एकनाथ शिंदे यांची नेतेपदी उद्धव ठाकरे यांनीच केली होती

    आमदारांनी उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता

  • 22 Feb 2023 11:34 AM (IST)

    Uddhav Thackeray vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी नेतेपदी नियुक्ती केली होती

    सरन्यायाधीश- याचा अर्थ त्यांची शिवसेना नेते म्हणून नियुक्ती केली का

    कपिल सिब्बल- काही निवडून आले, काहींची नियुक्ती केली

    सरन्यायाधीश – पण ते काय म्हणून आणि कुठे निवडून आले

    कपिल सिब्बल – राष्ट्रीय कार्यकारिणीत

  • 22 Feb 2023 11:14 AM (IST)

    सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात

    नवी दिल्ली : ठाकरे गटाचे वकील दुपारपर्यन्त युक्तिवाद करणार,

    सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू,

    कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू.

  • 22 Feb 2023 10:40 AM (IST)

    Maharashtra Politics Live : निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर आज दुपारी सुनावणी

    दुपारी 3.30 वाजता आयोगाविरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

    ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

    निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्याने ठाकरे गटा सर्वोच्च न्यायालयात

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

  • 22 Feb 2023 10:35 AM (IST)

    Maharashtra Politics Live : 21 तारखेपासूनच दहावी अनुसूची लागू होते; अनिल देसाई यांचा दावा

    जेव्हा घटना घडली तेव्हापासून दहावी अनुसूची लागू होते

    कायद्यातील तरतुदी लावूनच प्रकरण निकाली काढावे

    दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगाकडे होणार सुनावणी

    अनेक कायदे तज्ज्ञांनी विश्लेषण केले, त्याविपरीत निर्णय दिला गेला, अनिल देसाई यांचा दावा

  • 22 Feb 2023 10:29 AM (IST)

    राज्यातील सत्तासंघर्षावर ‘सुप्रीम’ सुनावणी थोड्याच वेळात…

    सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस

    काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला

    आज शिंदे गटाचे वकील काय युक्तिवाद करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे

Published On - Feb 22,2023 10:20 AM

Follow Us
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले