AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anju Nasrullah News | अंजू बनली फातिमा, इस्लाम कबूल, निकाहनंतर गिफ्टसचा वर्षाव, Video आला समोर

Anju Nasrullah News | अंजूला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी पाहुण्यांची रीघ लागली आहे. नवीन व्हिडिओ समोर आलाय. यात एक व्यक्ती अंजूला फातिमा म्हणून हाक मारतोय.

Anju Nasrullah News | अंजू बनली फातिमा, इस्लाम कबूल, निकाहनंतर गिफ्टसचा वर्षाव, Video आला समोर
Anju nikah with nasrullaImage Credit source: tv9
| Updated on: Jul 29, 2023 | 1:30 PM
Share

लाहोर : पाकिस्तानातून अंजूचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमधून सर्वच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. जे विविध अंदाज वर्तवले जात होते, त्यावर शिक्कामोर्तब झालय. नसरुल्लाच्या प्रेमासाठी भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने इस्लाम कबूल केला आहे. तिथे जाऊन अंजूच धर्मांतर झालय. यावर शिक्कामोर्तब झालय. अंजूच नवीन व्हिडिओ समोर आलाय. यात एक व्यक्ती अंजूला फातिमा म्हणून हाक मारतोय. त्याशिवाय लोक अंजूला निकाहचे गिफ्ट देण्यासाठी सुद्धा येत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात अंजूच्या जवळ काही नातेवाईक दिसतात. निकाहनंतर ते अंजूला भेटवस्तू देताना दिसतायत. अंजू पाकिस्तानात गेल्यानंतर तिने तिथे लग्न केलं, असा अंदाज वर्तवला जात होता. तो खरा आहे. तिने इस्लाम सुद्धा स्वीकारलाय. व्हिडिओ समोर आल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालय.

रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

याआधी अंजू आणि नसरुल्लाहचा कोर्टात जाण्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. दोघांनी कधीच मोकळेपणाने निकाह झाल्याच मान्य केलं नव्हतं. त्याशिवाय अंजूने सुद्धा इस्लाम कबूल केल्याच नाकारल होतं. अंजूचे पाकिस्तानातून अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नसरुल्लासोबत ती रोमान्स करताना दिसते. अंजू दोन मुलांची आई असून जयपूरला जाते सांगून ती घरातून बाहेर पडली होती.

सीमा हैदर सारखीच कथा

पण ती थेट पाकिस्तानात निघून गेली. फेसबुकवरुन ओळख झालेल्या मित्रांसोबत लग्न करण्यासाठी ती पाकिस्तानात गेली. सीम हैदर सारखीच तिची कथा आहे. सीमा हैदर भारतीय प्रियकर सचिन मीणासाठी पाकिस्तान सोडून भारतात आली. अंजू पाकिस्तानी प्रियकरासाठी भारतातून तिथे गेली. अंजू कधी भारतात परतणार?

अंजू पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये भारतात परतणार आहे, असं तिचा नवरा नसरुल्लाने एका मुलाखतीत सांगितलं. मुलांना सोबत घेऊन येण्यासाठी अंजू भारतात येणार आहे असं नसरुल्ला म्हणाला. अंजूला पाकिस्तानात नोकरी आणि घर मिळणार असल्याचा दावा तिच्या नवऱ्याने केला. अंजूवर कुठल्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली नाही. तिने स्वत:हून इस्लाम स्वीकारला, असं नसरुल्लाहच म्हणणं आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.